Wireless Charging Process: आजच्या काळात तुम्ही पाहिले असेल की लोक फोन चार्जिंग करण्यासाठी वायरलेस चार्जर वापरतात. या चार्जरने फोन चार्ज करण्यासाठी कोणतीही वायर वापरली जात नाही यामध्ये विशेष प्रकारची एक प्लेट असते ज्यावर फोन ठेवला की आपोआप चार्ज होऊ लागतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारे फोनला वायर कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही. पण कधी तुम्ही विचार केला आहे की ही प्लेट कशी काम करते आणि अशी काय सिस्टीम असते की ज्यावर फोन ठेवताच चार्जिंग सुरू होते? काळजी करू नका आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहोत. वायरलेस चार्जिंगची नक्की काय सिस्टीम असते आणि कोणत्याही वायर शिवाय फोनमध्ये वीज जाते कशी? चला जाणून घेऊ या
वायरलेस चार्जर कसा चार्ज करतो फोन?
तुम्हाला माहित असेल की आज काल स्मार्टफोनचे टाइप ए, टाईप बी किंवा टाईप सी असे चार प्रकारचे चार्जर आहे जे फोनला कनेक्ट करून चार्जिंग केले जाते. पण वायरलेस चार्जरची सिस्टीम थोडी वेगळी आहे. यासाठी एक डिव्हाइस वापरले जाते ज्याला इलेक्ट्रोमॅक्नेटीक इंडक्शन म्हटले जाते. हे डिव्हाइस हवेत इलेक्ट्रिक एनर्जी रिलीज करते आणि त्यामुळे त्याच्या चारी बाजूने मॅग्नेटीक फिल्ड तयार होते. ज्यामध्ये फोन ठेवताच त्यात असलेली कॉपर काईल या फिल्डमधून एनर्जी खेचून घेते आणि बॅटरीपर्यंत पाठवते. त्यामुळे फोनची बॅटरी चार्ज होऊ लागते.
हेही वाचा – स्मार्टफोनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स कसे ठेवावे? ‘या’ अॅपच्या मदतीने डाऊनलोड करू शकता सॉफ्ट कॉपी
अशामध्ये फोन चार्ज करण्यासाठी कोणतेही वायर किंवा पीनची आवश्यकता नसते. तुम्ही कोणताही जॅक न वापता फोन चार्ज करू शकता. पण, हे डिव्हाइस नॉर्मल चार्जरप्रमाणे वीजेशी कनेक्टेड असते आणि अशामध्ये वायरलेस चार्जिंगसाठी एक वायरची गरज असते आणि फक्त फोनला त्याची कोणतीही वायर जोडण्याची गरज नसते.
हेही वाचा – उन्हाळ्यात AC वापरताना लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी, तुमचे वीज बिल येऊ शकते कमी!
एक्सपर्टनुसार, फोन चार्ज करण्याची योग्य पद्धत नाही?
वायरलेस चार्जिंग कित्येक गोष्टीत सोयीस्कर वाटत असले तरीही काही रिपोर्ट्समध्ये एक्सपर्टने सांगितले आहे की, फोन चार्ज करण्याची ही योग्य पद्धत नाही. यामुळे फोन लवकर गरम होतो आणि कित्येक फोन जास्त हीट सहन करू शकत नाही आणि लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे फोन जास्त हायलेट नसेल तर त्यासाठी हा चार्जर जास्त चांगली कामगिरी करू शकत नाही असे मानले जाते. तसेच जेव्हा वायरलेस चार्जिंग केली जाते तेव्हा फोन पुन्हा पुन्हा चार्जिंगबरोबर डिसकनेक्ट होतो तेव्हा जो फोनसाठी चांगले मानले जात नाही.