How Duleep Trophy 2024 Winner Decided Without Final Match: दुलीप ट्रॉफी २०२४ चे जेतेपद मयंक अग्रवालच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पटकावले आहे. भारत ए संघाने भारत सी संघाचा १३२ धावांनी पराभव करत दुलीप ट्रॉफीचे जेतेपद जिंकले आहे. यंदाच्या दुलीप ट्रॉफीमध्ये ४ संघ सहभागी झाले होते. भारत ए, भारत बी, भारत सी, भारत डी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदा देशांतर्गत खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी होणे बंधनकारक केले होते, त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळत होते. यापूर्वी दुलीप ट्रॉफी ही विभागीय स्पर्धा असायची. पण यंदा ती चार संघांमध्ये खेळवली गेली. पण दुलीप ट्रॉफीचा विजेता कसा घोषित करण्यात आला, हे जाणून घेऊया.

केएल राहुल, इशान किशन, शुबमन गिल, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग आणि ऋषभ पंत यांसारखी अनेक मोठी नावे या मोसमात खेळताना दिसली. आगामी आंतरराष्ट्रीय कसोटी हंगामासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय संघ तयार करण्याच्या कल्पनेने ही स्पर्धा नवीन स्वरूपात खेळवली गेली आणि पहिल्याच बांगलादेश कसोटी सामन्यात याचा प्रत्यय पाहायला मिळाला. दुलीप ट्रॉफीचा पहिला राऊंड खेळल्यानंतर बांगलादेशच्या पहिल्या कसोटीसाठी संघात सामील झालेले खेळाडू टीम इंडियात दाखल झाले तर त्यांच्या जागी इतर खेळाडूंना दुलीप ट्रॉफी संघात बदली खेळाडू म्हणून निवडले.

हेही वाचा – Duleep Trophy: दुलीप ट्रॉफी जिंकल्यानंतर तिलक, आवेश, रियान यांचा Video व्हायरल, मैदानात असा साजरा केला विजयाचा आनंद

Duleep Trophy स्पर्धेत फायनल न होता कसा मिळाला विजेता?

दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये चार सहभागी झाले होते. दुलीप ट्रॉफी स्पर्धा ही राऊड रॉबिन पद्धतीने खेळवली गेली. या स्पर्धेत एकूण ३ फेऱ्या खेळवण्यात आल्या. या चारही संघांना एकमेकांविरूद्ध सामने खेळायचे होते. म्हणजेच प्रत्येक संघाने तीन सामने खेळले. या तिन्ही सामन्यानंतर जो संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी असेल तो संघ विजेता घोषित केला जाईल.

हेही वाचा – IND vs BAN: “…म्हणून मी बांगलादेशची फिल्डिंग सेट केली”, ऋषभ पंतने अजय जडेजाचा उल्लेख करत दिलं मनं जिंकणारं उत्तर

२२ सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा शेवटचा सामना खेळवला गेला. या सामन्यात विजय मिळवत भारत ए संघाने १२ गुणांसह या स्पर्धेचे जेतेपद मिळवले. भारत ए संघाने ३ पैकी २ सामने जिंकले तर पहिला सामना गमावला होता. भारत सी संघ या स्पर्धेत ९ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. भारत सी संघाने ३ पैकी १ सामना गमावला १ सामना जिंकला तर एक सामना अनिर्णित राहिला. भारत बी संघह ७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर भारत डी संघ ६ गुणांसह चौथ्या स्थाी आहे. २ सामने गमावले तर एक सामना डी संघाने जिंकला.

हेही वाचा – VIDEO: अफगाणिस्तानच्या फलंदाजाने स्वत:लाच केलं बाद; क्रिकेट इतिहासातला आश्चर्यकारक रनआऊट

दुलीप ट्रॉफीची गुणतालिका

दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये इतर कोणत्याही स्पर्धेपेक्षा वेगळी गुण प्रणाली आहे. दहा विकेट्सने किंवा डावाने जिंकणाऱ्या संघाला सात गुण मिळतील तर इतर कोणत्याही फरकाने विजय मिळवल्यास सहा गुण मिळतील.पहिल्या डावाच्या आघाडीसह सामना अनिर्णित राहिल्यास तीन गुण दिले जातील तर पहिल्या डावाच्या आघाडीशिवाय अनिर्णित राहिल्यास एक गुण दिला जाईल. बरोबरीत सामना सुटल्याल दोन्ही संघांना प्रत्येकी तीन गुण मिळतील. यंदाची दुलीप ट्रॉफी जिंकण्यासाठी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखाली भारत सी संघ प्रबळ दावेदार होता. पण भारत ए विरूद्ध सामन्यात पराभव झाल्याने भारत सी संघ थोडक्यासाठी हुकला.