पृथ्वीवर असे अनेक प्राणी किंवा पक्षी आहेत ज्यांबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. आपला राष्ट्रीय पक्षी मोराबद्दल सुद्धा अनेक रहस्य बनली आहेत. तसेच काही अफवा देखील पसरलेल्या आहेत. मोराला पिल्लं नेमकी कशी होतात, ते संभोग करतात का? असे अनेक प्रश्न आहेत ज्याची वेगवेगळी उत्तरे आपल्याला ऐकायला मिळतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत की लांडोर गर्भवती कशा होतात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विषयावर अनेकांनी वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. एका प्रसिद्ध कथा वाचकाने सांगितलं की, मोर पक्षी कधीच शारिरिक संभोग करत नाहीत. मोर आणि लांडोर रडतात आणि लांडोर ते अश्रू पिते आणि त्यातून ती गर्भवती राहते. याचमुळे श्रीकृष्ण मोराचे पीस हे त्यांच्या डोक्याला लावतात. परंतु हे सत्य नाही आहे. या कथा वाचकाचे सांगितलेल्या या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

गुगलवरही मोर आणि लांडोरच्या संभोगाविषयी अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरे देण्यात आली आहेत. मोर जर अंडे देत नाही, तर ते पिल्लांना जन्म कसे देतात. मोर खरंच अश्रु पिवून गर्भवती होतात का? मोराचे अश्रू पिऊन लांडोरची गर्भधारणा होते का? हे प्रश्न पाहिले की तुम्हालाही काही सुचेनासे होईल. मात्र, हा गोंधळ आता कमी होऊ लागलाय कारण काही कॅमेऱ्यांनी मोर आणि लांडोरच्या संभोगाची काही दृश्ये सर्वांसमोर आणली आहेत.

ही दृश्ये पाहून हे मात्र समजलंय की, मोर आणि लांडोर देखील इतर प्राण्याप्रमाणे प्रजनन करतात. मोबाईल आणि कॅमेऱ्यामुळे आपल्यापर्यंत ही माहिती पोहचू शकली आहे. आधी जेव्हा मोबाईल कॅमेरे नव्हते तेव्हा या अफवांवरच विश्वास ठेवणे भाग होते. विशेष म्हणजे, शास्त्रज्ञांनीही याविषयी कधीच योग्य माहिती लोकांना दिली नाही.

( हे ही वाचा: अंडं आधी की कोंबडी? वैज्ञानिकांनी शोधून काढलं या गहण प्रश्नाचं उत्तर)

पक्ष्यांचे संभोग हे फक्त १५ सेकंदाचे असते

लांडोर मोराचे अश्रु पिवून गर्भवती राहते हा खोटा आहे हे सिद्ध झाले आहे. मोर आणि लांडोर हे इतर पक्षांप्रमाणेच संभोग करतात. पक्ष्यांचे संभोग हे फक्त १५ सेकंदाचे असते. जेव्हा मोर किंवा इतर पक्षी संभोग करतात तेव्हा नर पक्षी मादी पक्षीच्या पाठीवर स्वार होतो. आणि स्वतःचे शुक्राणू मादीच्या शरीरात सोडत असतो. दिल्लीचे प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार विनोद गोयल यांनी मोर आणि लांडोरच्या संभोगाची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद केली आहेत.

मोर आणि लांडोर कसे एकमेकांच्या जवळ येतात ते जाणून घ्या

मोर आणि लांडोर यांमध्ये संभोग घडण्याआधी लांडोरला पाहून मोर नाचू लागतो. लांडोर त्याला आधी बघते जर ती त्याच्याकडे आकर्षित झाली तर लांडोर मोरासमोर येते. यानंतर १५ सेकंद ही संभोगाची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे मोर आणि लांडोर हे देखील इतर प्राण्यांप्रमाणेच संभोग करतात. आणि त्यामुळेच लांडोर गर्भवती होते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How female peacock get pregnant weeping or mating know the truth watch viral photo gps