How Kissing Bold Scene Shoot In Movies : चित्रपटात एखादा बोल्ड सीन नसेल, तर अनेक प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाही. कोणत्या प्रकारचे चित्रपट लोकांना आवडतात, चित्रपटातील कोणते सीन्स लोकांचे अधिक मनोरंजन करतात, याचा पूर्ण अभ्यास करूनच दिग्दर्शक या गोष्टींचा समावेश करत असतात. चित्रपटात इंटिमेट सीन असल्यावर चित्रपटगृहात प्रेक्षकही शिट्ट्यांचा गजर वाजवल्याशिवाय राहत नाहीत. इंटिमेट सीन्स दिल्यावर ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिजची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे दिग्ददर्शक स्टोरी लाईनपेक्षा इंटिमेट सीन्स शूट करण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. लोकांचं मनसोक्त मनोरंजन व्हावं, यासाठी अशाप्रकारचे सीन्स शूट करण्याचा अजेंडा दिग्दर्शकांचा असतो. अनेक वेबसीरिजमध्ये इंटिमेट सीन आणि अश्लील भाषा वापरल्याचं समोर आलं आहे. पण अशाप्रकारच्या सीन्ससाठी डायरेक्टरपासून सर्व क्रू मेंबर्सला प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

अनेक चित्रपटात किसिंग सीन्स असल्याचं तुम्हाला माहित असेल. पण चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स कशाप्रकारे शूट केले जातात? डायरेक्टर आणि क्रू मेंबर्सच्या समोर अभिनेत्री अगदी सहजपणे किसिंग सीन्स देतात? खरंतर चित्रपटात ज्या पद्धतीने सीन दाखवला जातो, तशाचप्रकारे तो शूट करावा लागतो, याची आवश्यकता नसते. जाणून घेऊयात बोल्ड सीन्स कशाप्रकारे शूट केले जातात.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
article about journey of author subodh kulkarni as a content writer
चौकट मोडताना : ‘कंटेन्ट रायटर’पर्यंतचा मुलाचा प्रवास
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

बॉडी डबलचा वापर करून शूट करतात सीन

हिरो किंवा हिरोईन अनेकदा चित्रपटासाठी किसिंग सीन्स द्यायला तयार होत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक अशाप्रकारच्या सीन्ससाठी प्लॅन बी तयार करतात. यासाठी बॉडी डबलचा वापर केला जातो. चित्रपटाच्या स्क्रीप्टमध्ये किसिंग सीन्सचा उल्लेख असल्यावर दिग्दर्शक त्यांच्याकडे असलेल्या प्लॅन बीचा वापर करतात. अशाप्रकारच्या सीन्ससाठी हिरो आणि हिरोईनच्या मध्ये एक आरसा लावला जातो. त्यानंतर दोघेही त्या आरशाला किस करतात. त्यामुळं चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना असं वाटतं की, ते ऐकमेकांना किस करतात.

नक्की वाचा – भुकंपरोधक आणि सामान्य इमारतीत नेमका फरक काय? भुकंप आल्यावर या इमारती कोसळत नाहीत? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

इल्यूजन क्रिएट करतात

जर हिरो किंवा हिरोईनने बोल्ड सीन देण्यास नकार दिला, तर क्रू मेंम्बर्सला इल्यूजन क्रिएट करून ब्यूटी शॉट्सवरून काम करावं लागतं. त्यावेळी सिनेमॅटोग्राफीच्या काही टेक्निक्सचा वापर केला जातो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं इंटिमेट सीन्स न देता प्रेक्षकांना वाटतं की, चित्रपटातील सीन खरा आहे. ब्यूटी शॉट्समध्ये एकमेकांना अलिंगन घालणे, किस करणे, हातात हात धरणे किंवा कॅमेराचा अॅंगल असा ठेवावा, ज्यामुळे शरीराचा भाग कव्हर केला जाईल. ही सर्व सिनेमॅटोग्राफीची टेक्निक आहे. अशाप्रकारच्या सीन्समध्ये बेडवर सॅटिनचे बेडशीट्स वापरले जातात आणि त्याच्यात लपवून फक्त इल्यूजन क्रिएट केलं जातं.

कोणत्या सीन्ससाठी ट्रिकचा वापर करतात

जर एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने बोल्ड सीन्स देण्यास नकार दिल्यास दिग्दर्शकाला क्रोमा शॉट्स द्यावे लागतात. हे सीन्स निळ्या आणि हिरव्या रंगांच्या कवरसोबत केले जातात. त्यानंतर एडिटिंग केल्यावर अशाप्रकारचे सीन्स काढून टाकले जातात. हिरो-हिरोईनला किसिंग सीन्स देण्यात काही अडचणी असल्यास, त्यांच्यामध्ये दुधीभोपळा ठेवला जातो. हिरव्या रंगांचा भोपळा असल्याने क्रोमाचं काम करता येतं. त्यामुळं दोघेही त्याला भोपळ्याला किस करतात. त्यानंतर पोस्ट प्रोडक्शनच्यावेळी सीनमधून ते काढून टाकलं जातं आणि प्रेक्षकांना तो सीन खरा असल्यासारखा वाटतो.

प्रॉपचा वापर करतात

आर्टिस्टची स्वत:ची पसंत असते की, इंटिमेट सीन देत असताना दुसऱ्या आर्टिस्टपासून शारीरिक अंतर किती ठेवावे, इंटिमेसी कोऑर्डिनेटरही आर्टिस्टच्या पसंतीचा सन्मान करतात. यासाठी काही प्रॉप्ससारखे सॉफ्ट पिलो,क्रोच गार्ड, मोडेस्टी गारमेंटच्या वस्तूंचा वापर केला जातो.

याची विशेष काळजी घेतली जाते

कोणत्याही इंटिमेट सीनला शूट करण्यासाठी अभिनेता किंवा अभिनेत्रीची परवानगी असणे अत्यंत गरजेचं आहे. अशाप्रकारचे सीन शूट करताना या गोष्टींची खूप काळजी घेतली जाते. अभिनेत्रीच्या खासगी गोष्टींची योग्यरित्या काळजी घेण्यासाठी लोगार्ड किंवा एयर बॅगचा वापर केला जातो. अभिनेत्रीसाठी पुशअप पॅड्स आणि टॉपलेस दाखवायचं असल्यास पुढे वापरलेल्या सिलिकॉन पॅडचा वापर केला जातो.