प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य नातेसंबंधांवर अवलंबून असते. रोजच्या आयुष्यात व्यक्तीला प्रत्येक टप्प्यात नव-नवीन माणंस भेटतात आणि त्यांच्यासोबत नवीन नाती तयार होतात. एका व्यक्तीची जन्माला आपल्यापासून आई-वडिल बहिण, भाऊ आणि नंतर एक एक करून सर्व नाती तयार होत जातात. यामुळे नात्यांशिवाय माणसाचे आयुष्य हे निरर्थ असते. कारण या नात्यांमुळेच व्यक्तीला एक ओळख मिळत असते. व्यक्तींच्या या नातेसंबंधांवर ९० च्या दशकात ब्रिटीश मानसशास्त्रज्ञ रॉबिन डन्बर यांनी एक सिद्धांत मांडला होता. या सिद्धांत मेंदूचा आकार आणि सामाजिक गटाच्या आकाराशी संबंधित आहे. सिद्धांतानुसार, ज्यांचा मेंदूंच्या विकास अधिक वेगाने होतो त्यांचे नातेसंबंधही अधिक तयार होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका व्यक्तीच्या आयुष्यात किती जण खास असतात?

डन्बर यांनी सांगितले की, एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात जास्तीत जास्त १५० लोकांच्या चांगल्या संपर्कात असते किंवा त्यांच्याशी खास संबंध असतात. याला डन्बर नंबर असे म्हणतात. यानुसार आपल्या आयुष्याच्या वर्तुळात केवळ १.५ ते ५ व्यक्ती अशा असतात ज्यांच्या चांगल्या- वाईट वागण्याचा किंवा त्यांच्या असण्या-नसण्याचा आपल्याला खूप फरक पडतो.

आयुष्यात एका व्यक्तीचे किती खास मित्र असतात?

यानंतर आपल्या आयुष्यात अशा १५ व्यक्ती असतात ज्यांना आपण आपले चांगले मित्र मैत्रिणी मानतो. ह्या व्यक्ती नातेवाईक, शेजारी, शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा कुठेही ओळख झालेल्या कोणीही असू शकतात. परंतु त्यांच्या मैत्रीची जागा सहसा कोण घेऊ शकत नाही. यानंतर अशा ५० व्यक्ती येतात, ज्यांच्यासोबत आपले मैत्रीचे नाते असते, पण ते फक्त कामाशी काम ठेवतो त्याप्रकारे असते. ज्याला मीनिंगफुल कॉन्टॅक्ट असे म्हणतात.

डन्बर यांच्या ‘फ्रेंड्स-अंडरस्टँडिंग द पॉवर ऑफ अवर मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशनशिप्स’ या पुस्तकातील दाव्यानुसार, एका व्यक्तीच्या आयुष्यात वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत जवळचे नातेसंबंध तयार झालेले असतात. ज्यामध्ये केवळ १.५ ते ५ जणचं असतात. यात जोडीदार, मुलं, पालक किंवा मित्र-मैत्रिणी यांचा समावेश असू शकतो. वाढत्या वयाबरोबर नात्याचे वर्तुळ लहान होत जाते. एक व्यक्ती जेव्हा वयाची सत्तरी ओलांडतो तेव्हा त्यासोबत केवळ १.५ लोक असतात.

यानंतर येते आपल्या आयुष्यातील अगदी खास नाते ते म्हणजे जोडीदार, प्रियकर- प्रियसी. या नात्यांवर डन्बर म्हणाले की, या नात्यांमध्ये आल्यानंतर आपण आपले चांगले दोन मित्र किंवा मैत्रिणी गमावलो. कारण हे खास नातं टिकवण्यासाठी आपण आपले सर्व लक्ष आणि शक्ती वापरत असतो. अशा परिस्थितीत चांगले मित्र मैत्रिणी असलेल्या किमान दोन व्यक्ती तरी आपल्यापासून दूरावतात. अनेकदा यासाठी गैरसमज, भांडण, हेवेदावे किंवा परिस्थिती कारणीभूत असते.