Total Number Of Elephant Teeth: हत्ती पृथ्वीवरील सर्वात सुंदर प्राण्यांपैकी एक आहे, तसेच हत्तीला सर्वात बुद्धीमान आणि बलाढ्य प्राणी समजलं जाते. विशाल देह असणारा प्राणी म्हणून हत्तीला ओळखले जाते. हिंदू धर्मानुसार हत्तीला गणपतीचे रुप मानले जाते. हत्तीचे दात खूप महागडे असतात, असे आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो. तुम्ही आतापर्यंत हत्तीचे दोन सुळेच पाहिले असतील पण तुम्हाला माहितीये का हत्तीचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात. हत्तीचे दोनच दात दिसतात पण खायचे किती असतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.
हत्तीचे दोनच दात दिसतात पण खायचे किती असतात?
माणसांचं कसं असतं, लहान असताना दुधाचे दात येतात नंतर मग ते पडतात आणि दुसरे दात येतात. मात्र हत्तीला त्याच्या आयुष्यात दोनदा नव्हे तर सहा वेळा दात येतात. हो हत्तीला एकून २६ दात असतात. जे दोन मुख्य दात असतात त्यांना गजदंत म्हणतात. याच हत्तीच्या दातांना बाजारात मोठी मागणी आहे.
दागिने बनवले जातात
हत्तीच्या दातांचा उपयोग दागिने बनवण्यासाठी केला जातो. या दातांपासून कधी गळ्यातला हार, कधी कानातले; तर कधी बांगड्या बनवल्या जातात. महिलांकडून हत्तीच्या दातांपासून बनलेल्या दागिन्यांना विशेष मागणी असते. त्यामुळे हत्तीचे दात खूप महाग असतात. लेखीका Hailey Pruett यांनी याबाबत माहिती दिली आहे. Hailey Pruett या प्रामुख्याने सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांसंदर्भात लिखाण करतात.
हेही वाचा >> नवरदेवाच्या किंवा नवरीच्या बहिणीला ‘करवली’ का म्हणतात? या शब्दाचा मूळ अर्थ काय? जाणून घ्या
हत्ती हा अतिशय खास प्राणी आहे
हत्ती हा एक अतिशय खास प्राणी आहे. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे आणि ते श्रद्धेचे प्रतीकही आहे. असो, हिंदू धर्माचे वैशिष्ट्य असे आहे की त्यात निसर्ग आणि प्राण्यांची पूजा केली जाते, यावरून प्राचीन भारतीय लोक निसर्गाप्रती किती समर्पित होते हे दिसून येते. हत्तीच्या खाद्याविषयी सांगायचे तर, हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे.
हत्तीच्या दातांची तस्करी
हत्तीच्या दातांची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. ‘वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’ कलम ९ अंतर्गत हस्तिदंताचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते.