Smartphone Life: अशी अनेक लोक आहेत जे दरवर्षी फोन बदलतात. काहीजण अशी देखील आहेत जी काही महिन्यांनी फोन बदलतात. याचे कारण म्हणजे त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलचे अपग्रेडेड व्हर्जन बाजारात आले असेल किंवा एखाद्याची आवड असू शकते. मात्र, असे अनेक लोक आहेत जे एकदा फोन विकत घेतात आणि तो किमान दोन-तीन वर्षे वापरतात. परंतु या सर्वांमध्ये स्मार्टफोनची शेल्फ लाइफ किती आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.
स्मार्टफोनची शेल्फ लाइफ किती असते?
तज्ञांच्या मते, कोणत्याही कंपनीसाठी स्मार्टफोनची शेल्फ लाइफ भारतात फक्त ९ महिने असते. हे झालं कंपनीनुसार. ट्रॅडिशनल नुसार स्मार्टफोनचे शेल्फ लाइफ १८ महिने आहे. काही तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, पूर्वी स्मार्टफोनचा बाजार वर्षाला चालत असे. मग बाजारपेठेत स्पर्धा वाढू लागली आणि हे चक्र कमी झाले. याचा फायदा स्मार्टफोन कंपन्यांनाही होऊ लागला.
( हे ही वाचा: टॉयलेट फ्लशमध्ये एक मोठे आणि एक लहान बटण का असते? यामागील लॉजिक जाणून तुम्हीही थक्क व्हाल)
दरवर्षी स्मार्टफोन बदलणे योग्य आहे का?
तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी एखादा स्मार्टफोन बदलावा लागतो, तर त्या स्मार्टफोनला चांगला म्हणता येणार नाही. जर तुमचा स्मार्टफोन चांगला असेल तरच त्याची शेल्फ लाइफ २ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल.