Cost of Helicopter: आजकाल बरेचसे लोक विमानाने प्रवास करत असतात. लांबचा प्रवास करण्यासाठी विमानसेवा सुलभ असते. विमानाव्यतिरिक्त हेलिकॉप्टरनेदेखील हवेत उडता येते. सैन्य दलातील जवान, राजकीय नेते यांसारख्या खास लोकांना हेलिकॉप्टरमधून फिरण्याचा अनुभव घेता येतो. लष्कर, सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त पर्यटनांमध्येही हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.जेव्हा आकाशातून हेलिकॉप्टर उडत असते, तेव्हा आपणही त्यामध्ये एकदा तरी बसावे असा विचार प्रत्येकाच्या मनात येत असतो. अभिनेते, स्टार खेळाडू खासगी विमान खरेदी केल्याचे आपण ऐकले असेल, पण विमानाप्रमाणे हेलिकॉप्टर विकत घेता येते का?

कशी ठरते हेलिकॉप्टरची किंमत?

तुमच्या कधी जर भरपूर पैसे असतील, तर तुम्ही हेलिकॉप्टर खरेदी करु शकता. Airbus Helicopters, Bell Helicopters, Leonardo Helicopters, Robinson आणि Sikorsky असे हेलिकॉप्टर्सचे काही प्रकार आहेत. या प्रकारांवरुन हेलिकॉप्टरची किंमत ठरत असते. प्रत्येक मॉडेलच्या हेलिकॉप्टरची क्षमता वेगवेगळी असते. त्याशिवाय कॅपेसिटी, पावर, फ्लाइट स्पीड आणि एन्ड्यूरन्स अशा काही गोष्टींच्या आधारावर हेलिकॉप्टरची क्षमता ठरत असते. यावरुनच हेलिकॉप्टरची किंमत निश्चित केली जाते.

Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Mig 29 crashes
Mig 29 Crasesh : भारतीय हवाई दलाचे मिग २९ लढाऊ विमान कोसळले; जमिनीवर कोसळताच आगीत भस्मसात!
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
Aviation Turbine Fuel price
Aviation Turbine Fuel: विमान इंधन आणि वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग
Why Kolkata Knight Riders deducted Rs 12 Crore After IPL 2025 Retentions know about
Kolkata Knight Riders : केकेआरला लिलावापूर्वी बसला मोठा फटका, तिजोरीतून वजा होणार १२ कोटी रुपये, नेमकं काय आहे कारण?
tejas mk1a
विश्लेषण: हवाई दलाची चिंता का वाढतेय?
Vajra shot india made
शत्रूच्या ड्रोन्सचा नायनाट करायला ‘वज्र गन’ सज्ज; काय आहे याचं महत्त्व व वैशिष्ट्य?

flyflapper वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर मॉडेलवरुन त्यांची किंमतीवर परिणाम होत असतो. H125, H135, BELL 505, BELL 407, BELL 429, AW109 GRAND NEW, R44 आणि R66 असे हेलिकॉप्टर्सचे मॉडेल्स आहेत. H125 मॉडेलची किंमत $3,900,000 म्हणजे 32,20,02,915.00 रुपये इतकी आहे. H135 मॉडेल $6,200,000 म्हणजे 51,19,02,070 रुपयांनी खरेदी करता येते. Bell 429 हे सर्वात महागडे हेलिकॉप्टर मॉडेल आहे. त्याची किंमत $8,000,000 म्हणजे 66,05,18,800 रुपये आहे. तसेच R44 मॉडेल हे सर्वात स्वस्त हेलिकॉप्टर मॉडेल आहे. हे मॉडेल $500,000 म्हणजेच 4,12,82,425 रुपयांना विकत घेता येते.

आणखी वाचा – पक्षी एकत्र उडताना त्यांच्या थव्याचा आकार ‘V’ अक्षरासारखा का असतो? जाणून घ्या यामागील खास कारण

(flyflapper वेबसाइटवरुन वरील माहिती घेण्यात आली आहे.)