How Much LED Bulb Cost: विजेचा शोध लागल्यापासून आपण जवळपास प्रत्येक कामासाठी विद्युत उपकरणांचा वापर करू लागलो आहे. अर्थात वेळ वाचवण्यासाठी हा नामी उपाय आहे यात काही शंका नाही पण वेळ वाचवताना ही उपकरणे आपल्या खिशाला मात्र कात्री लावतात. अनेकजण घर घेताना मोकळी हवेशीर व भरपूर उजेड येईल अशीच जागा निवडतात पण नंतर त्याच घराच्या बाजूला जेव्हा अन्य बिल्डिंग उभ्या राहतात तेव्हा चांगलीच पंचाईत होते. मग काय दिवसभर घरात बल्ब, ट्यूबलाईट लावून ठेवण्याला पर्याय नसतो. तुम्ही कधी हा विचार केला आहे का, तुमच्या महिन्याच्या विजेच्या बिलामध्ये घरात लावलेल्या बल्बचा खर्च किती टक्के असेल? चला तर मग आज जाणून घेऊयात..
साधारणतः हल्ली सर्वच घरांमध्ये एलईडी बल्ब वापरले जातात. नियमित बुलबीच्या तुलनेत हे बल्ब ८० ते ९० टक्के कमी वीज वापरतात. तरीही नेमका खर्च किती येणार हे प्रत्येक बल्बच्या वॉल्ट क्षमतेवर व तुमच्या शहरातील विजेच्या प्रति युनिट दरावर अवलंबून असते. आपण उदाहरण म्हणून अनेक घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बल्बचा खर्च पाहुयात. एका एलईडी बल्बची वॉल्ट क्षमता ९ वॉल्ट आहे आणि तुमच्या शहरात आठ रुपये प्रति युनिट (kWh) विजेचा दर आहे तर,
0.009 kW x 24 तास = 0.216 kWh
0.216 kWh x 8/kWh = 1.73 रुपये
हे ही वाचा<< .. म्हणून ‘या’ श्रीमंत गावात कुणी कपडेच घालत नाही! भारतात सुद्धा ‘या’ ठिकाणी आहे विवस्त्र राहण्याचा नियम
महिन्याभरात बल्बमुळे किती बिल येईल?
वर आपण पाहिलेली आकडेवारी पाहून थोडा आनंद झाला असेल ना, आपल्या शहरातील विजेचा दर कमी जास्त असला तरी साधारण एका एलईडी बल्बचा खर्च दिवसाला १ रुपया ७३ पैसे इतका असू शकतो. जर महिन्याची आकडेवारी काढायची तर या रक्कमेचा आपण ३० ने गुणाकार करूया, यानुसार महिन्याला साधारण ५२ रुपये खर्च होऊ शकतो.