Railway Luggage Rules: रेल्वेला भारताची लाईफलाईन (Indian Railways) म्हटले जाते. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेने प्रत्येक गोष्टीचे नियम ठरवले आहेत. रेल्वेमधून नेण्यात येणार्या सामानासाठी (Railway Luggage) सुद्धा एक नियम आहे. मात्र, अनेक लोकांना हा नियम माहित नाही की, रेल्वे प्रवासात आपण किती सामान घेऊन जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही रेल्वेचा प्रवास करताना आपल्या सबोत किती सामान घेऊन जाऊ शकता.
रेल्वे बोर्डाने आणले नवे नियम
आता रेल्वे बोर्डाकडून प्रवास करताना किती सामान घेऊन जाऊ शकता याबाबतही नियम केले आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान सामान नेण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. असे असतानाही अनेक प्रवासी भरपूर सामान घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करतात. डब्याच्या आत गॅलरीत सामान ठेवल्याने इतर प्रवाशांना ये-जा करताना खूप त्रास होतो. अशा प्रवाशांना त्यांचे सामान बुक करण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे.
रेल्वे मंत्रालयाने लोकांना ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. अतिरिक्त सामान घेऊन ट्रेनने प्रवास करू नका. जर तुमच्याकडे जास्त सामान असेल तर पार्सल ऑफिसमध्ये जाऊन सामान बुक करा, असं रेल्वेने म्हटलं आहे.
(हे ही वाचा : तुमचही रेल्वे तिकीट हरवलयं? आता बिनधास्त करा तिकीटाशिवाय प्रवास; जाणून घ्या कसं?)
सामानाबाबत काय आहेत रेल्वे नियम (Railway Luggage Rules)
रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवासी ४० ते ७० किलो सामान घेऊन जाऊ शकतो. विहित मर्यादेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. रेल्वेच्या डब्यानुसार सामानाचे वजन वेगळे ठरवण्यात आले आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ४० किलो वजनाच्या सामानासह प्रवासी स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकतो. तर एसी टू टायरमध्ये ५० किलो सामान सोबत नेले जाऊ शकते. फर्स्ट क्लास एसीबद्दल बोलायचे झाले तर त्यात ७० किलोपर्यंत सामान नेण्याची सूट आहे.
रूग्णांसाठी वेगळा नियम
रेल्वे प्रवासात मोठ्या आकाराचे सामान घेऊन जाणार्या लोकांना किमान ३० रुपये भरावे लागतात. ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सामान असेल तर दिडपट जास्त चार्ज द्यावा लागतो. अनेकदा लोक रूग्णासोबत प्रवास करतात अशावेळी त्यांच्या आवश्यक सामानाबाबत रेल्वेचे वेगळे नियम आहेत. या अंतर्गत डॉक्टरांचया सल्ल्याने रूग्ण आपल्यासोबत ऑक्सीजन सिलेंडर आणि स्टँड घेऊन जाऊ शकतो.
रेल्वे प्रवासात स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास परवानगी नाही. सोबतच शुल्क भरल्यानंतर सुद्धा तुम्ही कमाल १०० किलोग्रॅम पर्यंतच सामान आपल्या सोबत घेऊन जाऊ शकता.