प्रवास जवळचा असो किंवा लांबचा, ट्रेनचा प्रवासच सर्वात चांगला प्रवास मानला जातो. सध्याच्या घडीला आपल्या देशात १५ हजार ट्रेन चालतात. जेणेकरून रल्वेचा संपर्क भारताच्या प्रत्येक शहरापासून गावांपर्यंत जोडला जाईल. भारतीय रेल्वेला जगातील चौथा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क म्हटलं जातं. रेल्वेमुळे आपण लांबचा प्रवासही कमी बजेटमध्ये करतो. पण तुम्हाला माहित आहे की, जी ट्रेन तुमचा प्रवास खूप चांगला करते, त्या ट्रेनला बनवायला किती खर्च येतो? याचं उत्तर तुमच्याकडेही नसेल. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, एक ट्रेन बनवण्यासाठी रेल्वे किती पैसे खर्च करते आणि प्रत्येक ट्रेनची किंमत एकसारखी असते का नाही, तर जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो?
एका ट्रेनमध्ये अनेक प्रकारचे कोच असतात. ज्यामध्ये जनरल कोच, स्लीपर कोच आणि एसी कोच यांचा समावेश असतो. जनरल कोचला बनवण्यासाठी १ कोटी रुपयांचा खर्च येतो. एका स्लीपर कोचला बनवण्यासाठी १.५ कोटी रुपयांचा खर्च येतो. एका एसी कोचला तयार करण्यासाठी २ कोटी रुपयांचा खर्च येतो. तसंच एका इंजिनची किंमत १८ ते २० कोटी रुपये असते. याप्रकारे २४ डब्ब्यांची एक पूर्ण ट्रेन बनवायला रेल्वेचे जवळपास ६० ते ७० कोटी रुपये खर्च होतात.
२४ डब्ब्यांची पूर्ण ट्रेन बनवण्यासाठी रेल्वेला जवळपास ६० ते ७० कोटी रुपये खर्च करावे लागतात. प्रत्येक ट्रेनला बनवण्यासाठी एकसारखा खर्च होत नाही. तर वेगवेगळ्या ट्रेनसाठी खर्चाची रक्कम वेगळी असते. MEMU 20 डब्ब्यांच्या सामान्य ट्रेनसाठी ३० कोटी रुपये खर्च येतो. कालका मेल २५ डब्ब्यांवाली ICF ट्रेनला ४०.३ कोटी रुपये खर्च येतो. हावडा राजधानी २१ डब्ब्यांवाली LHB प्रकारच्या ट्रेनची किंमत ६१.५ कोटी रुपये आहे. तर अमृतसर शताब्दी १८ डब्ब्यांची LHB प्रकारच्या ट्रेनची किंमत ६० कोटी रुपये आहे. इंजिनच्या किमतीचाही यामध्ये समावेश आहे.
वंदे भारत ट्रेनची किंमत
एका सामन्य ट्रेनची किंमत जवळपास ६० ते ७० कोटी रुपयांपर्यंत आहे. भारतात चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनची किंमत जाणून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. भारतात १३ रुटवर चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनची किंमत जवळपास ११० ते १२० कोटी रुपये इतकी आहे.