दरवर्षीच्या पावसाळ्यात मुंबईकरांना एका समस्येला सामोरे जावे लागते. ते म्हणजे जोरदार पाऊस पडला की, मुंबई तुडुंब भरून जाते. कारण मुंबईची रचना ही बशीसारखी आहे असे म्हटले जाते. त्यामुळे पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅक, घरांमध्ये पाणी भरतं आणि धावणारी मुंबई काही काळासाठी स्तब्ध होते. तर यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी एक महत्त्वाची योजना आणली. सगळीकडे भरणारं पाणी समुद्रात नेऊन सोडायचं आणि मुंबईच्या सांडपाण्याची व्यवस्थादेखील करायची. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून एक प्रकल्प सादर केला, त्याचे नाव ‘लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन’ असे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, मुंबईच्या समुद्रातच मुंबईची आणि मुंबईच्या सात बेटांची गोष्ट लपलेली आहे; तर याचबद्दल आपण या लेखातून जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर लोकसत्ता डॉट कॉमने ‘गोष्ट मुंबईची’ या सीरिजच्या शूटदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती आणि तिथे असलेल्या पिल्हो लावा स्ट्रक्चरबद्दल जाणून घेतलं. तेव्हा लक्षात आलं की, मुंबईची निर्मिती ही समुद्रामध्ये झाली होती. खाऱ्या पाण्यात ज्या ज्वालामुखीचे प्रस्फोट झाले, त्यामधून बाहेर निघालेला जो लाव्हारस होता, त्यामधूनच आपल्या लाडक्या मुंबईची निर्मिती झाली आहे. त्यामुळेच आपल्याला अर्धवर्तुळाकार बे फॉर्मेशन आहे, ते मुंबईत तीन ठिकाणी पाहायला मिळतं. १. मरीन ड्राईव्हचा परिसर म्हणजे राणीचा रत्नहार (बॅकबे), २. वरळीचा बे आणि ३. महीम बे इत्यादी. तर या तीन बे बद्दल अधिक जाणून घेऊया.

हेही वाचा…अयशस्वी वॉलपेपर ते अप्रतिम पॅकेजिंग मटेरियल; ‘बबल रॅप’चा हा रंजक प्रवास तुम्हाला माहिती होता का ? नक्की वाचा…

मुंबईच्या ‘बे’ची अर्धवर्तुळाकार रचना-

तर समुद्राच्या आतमध्ये खोलवर दोन प्रकारचे खडक असतात. एक म्हणजे गाळाचा खडक आणि दुसरं म्हणजे लाव्हारस. तर या लाव्हारसाचा एक विशिष्ट असा चिखल तयार होतो, ज्याला इंग्रजीत शेल असं म्हणतात. शेलचा जो खडक आहे, तो वरळीच्या बाजूला खोल समुद्रात गेला आहे. तर या गाळाच्या खडकामुळे झालंय असं की, ‘बे’ची रचना ही अर्धवर्तुळाकार झाली आहे आणि या अर्धवर्तुळाच्या दोन्ही टोकांमध्ये जमीन व आतल्या बाजूला समुद्राचे पाणी आहे. तसेच जो गाळाचा किंवा चिखलाचा खडक आहे, त्याच्यावर सातत्याने समुद्राच्या पाण्याच्या लाटा आपटतात, त्यांची झीज होते आणि गाळ खालच्या बाजूला जाऊन बसतो. नंतर या गाळाच्या खडकाची मोठ्या प्रमाणावर झीज झाली. त्यामुळे या तिन्ही बे म्हणजेच, वरळी बे आणि माहीम बे आणि तिसरा मरीन ड्राइव्हचा परिसर बॅक बेची निर्मिती झाली आहे. बे ची विशिष्ट्य रचनेमागे वोलकॅनिक इरॅफ्टन, गाळाचा खडक, समुद्राचे सातत्याने येणं, जमिनीची किंवा गाळाच्या खडकाची झीज होणं इत्यादी याची महत्त्वाची कारणे आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

पुणे विद्यापीठातील भूगर्भतज्ज्ञ डॉक्टर रेमन स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील ज्येष्ठ भूगर्भतज्ज्ञ डॉक्टर गोडबोले आणि डॉक्टर फडके या दोघांनी मुंबईच्या भूरचनाशास्त्रावर काम केलं आहे आणि त्यांनी एक थिअरी (गृहीतक) मांडली. भूगर्भशास्त्राच्या संकल्पनेमध्ये त्याला वॉल्ट ट्रॉन सबसिस्टन्स असे म्हणतात. याचा अर्थ ज्वालामुखीची निर्मिती असा आहे. ज्वालामुखीतून निर्माण झालेला लावा म्हणजे लाव्हारस; त्यातून मुंबईची निर्मिती झाली खरी. पण, कधी कधी काय होतं, या त्रिकोणी आकाराचा ज्वालामुखीचा डोंगरासारखा भाग तयार होतो. त्यातला खालचा भाग जिथे फक्त
लाव्हारस असतो त्याला मॅग्मा चेंबर असं म्हणतात. तर हा जो खालचा भाग आहे, जो काही विशिष्ट घडामोडींमुळे कोसळतो. हा कोसळला की काय होतं, त्रिकोणाच्या वरचा भाग जो असतो तो देखील कोसळून खाली पडतो. तर याच मॅग्मा चेंबरचा भाग कोसळल्यामुळे मुंबईची सात वेगवेगळी बेटं तयार झाली. ज्याच्यामुळे आपल्याला या तिन्ही भागांत बे फॉर्मेशन झालेलं दिसतं आहे. तर मुंबईच्या बे फॉर्मेशन तयार होण्याची दोन कारणे आज आपल्यासमोर आहेत. एक म्हणजे गाळाचा खडक, ज्याला आपण शेल म्हणतो आणि दुसरं म्हणजे कॉल्ड ड्रॉन सबसिस्टन्स…

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How seven islands became the present day city of mumbai interesting story in marathi of back bay worli bay and mahim bay must read asp
First published on: 24-06-2024 at 16:08 IST