करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, लॉकडाउनचा कालावधीही वाढवण्यात येणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. लोकांनी केवळ आपल्या घरातच राहावं, असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु कोणत्याही अति महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जायचं असल्यास राज्य सरकारांनी नागरिकांना ई-पास देण्याची सुविधा सुरू केली आहे. पाहुया यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा पास तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीनं राबवण्यात येत आहे. या पासद्वारे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी मिळणार आहे. यासाठी ऑनलाइनच अर्ज करावा लागणार आहे आणि पासही संबंधित वेबसाईटवरूनच घ्यावा लागेल. तसंच यामध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे, या माहितीसह विशेष माहितीही मागवण्यात येते.

  • समजा तुम्हाला महाराष्ट्रातून एका ठिकाणी जायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या लिंकवर जावं लागेल.
  • https://covid19.mhpolice.in/registration
  • त्यानंतर जे पेज उघडेल त्यावर तुमच्या मोबाईल क्रमांकाची माहिती मागवली जाईल. त्यानंतर कॅप्चा भरून तुम्हाला ओटीपीवर क्लिक करावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला आलेला ओटीपी टाकल्यावर एक नवं पेज उघडेल.
  • या पेजवर तुम्हाला तुमचं नाव, वय, पत्ता, ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्याबद्दल माहिती द्यावी लागेल.
  • यानंतर तुम्ही स्वत: अर्ज करत आहात का किंवा कोणत्या संस्थेकडून करत आहात हे सांगावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवासाचं कारणं स्पष्ट करावं लागेल.
  • त्यानंतर एक आयडी प्रुफ आणि अर्ज करणाऱ्याचा फोटो अपलोड करावा लागेल.
  • याव्य़तिरिक्त गाडीची माहिती वैद्यकीय प्रमाणपत्राचीही माहिती द्यावी लागेल.
  • यानंतर तो फॉर्म सबमिट करावा लागेल.
  • यानंतर डिस्ट्रिक्ट ऑथोरिटीकडून फॉर्मची पडताळणी करण्यात येईल.
  • सर्व प्रक्रिया योग्य असल्यात ई पास जारी केला जाईल. तसंच तो फॉर्म डाऊनलोडही करता येणार आहे.
  • ईमेल आणि एसएमएसद्वारेही याची माहिती देण्यात येईल.
  • कोणत्या राज्यांसाठी कोणत्या लिंक पाहा


महाराष्ट्र

https://covid19.mhpolice.in/registration

कर्नाटक
https://sevasindhu.karnataka.gov.in/Sevasindhu/English

केरळ
https://pass.bsafe.kerala.gov.in/

गुजरात
https://www.digitalgujarat.gov.in/Citizen/CitizenService.aspx

पश्चिम बंगाल
https://www.wb.gov.in/

पंजाब
https://epasscovid19.pais.net.in/

गोवा
https://www.goaonline.gov.in/

हिमाचल प्रदेश
https://covid19epass.hp.gov.in/applications/epass/apply

जम्मू काश्मीर
https://serviceonline.gov.in/login.do?state_code=1&OWASP_CSRFTOKEN=SV32-B7OM-DFWJ-763P-LWBH-3FXY-6H0P-CPIL

झारखंड
https://epassjharkhand.nic.in/public/pan_reg.php

उत्तर प्रदेश
https://164.100.68.164/upepass2/Apply.aspx

चंडीगड
https://admser.chd.nic.in/dpc/SearchReports.aspx

बिहार
https://serviceonline.bihar.gov.in/resources/homePage/10/loginEnglish.htm

दिल्ली
https://59.180.234.21:8080/movementservices/login.htm

उत्तराखंड
https://policecitizenportal.uk.gov.in/e_pass/Home/Index

तामिळनाडू
https://tnepass.tnega.org/#/user/pass

मध्य प्रदेश
https://mapit.gov.in/COVID-19/applyepass.aspx?q=apply

ओदिशा
https://edistrict.odisha.gov.in/login.do?

आसाम
https://eservices.assam.gov.in/login.do?

तेलंगण
https://epass-svc.app.koopid.ai/epassportal/widgets/dashboard.html

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to apply for e pass travel during lockdown emergency jud