How To Apply For Personal Loan Step By Step Guide : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आहे. एखाद्या सणानिमित्त नवनवीन वस्तूंची खरेदी करणे म्हणजे आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. नवीन फ्रिज, टीव्ही, गाडी, तसेच घर, लग्नासाठी कर्ज घेण्याचा आपण सगळे विचार करीत असतो. पण, जर तुम्ही एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी, वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करीत असाल, तर पर्सनल लोन हा एक बेस्ट पर्याय असू शकतो. झटपट पर्सनल लोनची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर काही तासांनी पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. झटपट वैयक्तिक कर्जासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज कसा करायचा (How To Apply For Personal Loan ) याबद्दल जाणून घेऊ…

इन्स्टंट पर्सनल लोन (झटपट वैयक्तिक कर्ज) म्हणजे काय ?

वैयक्तिक कर्ज हे एक प्रकारचे सुरक्षित कर्ज आहे; ज्यासाठी बँकेला भेट न देता, ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो. या कर्ज पद्धतीमध्ये सहसा झटपट अर्ज प्रक्रियेचा समावेश असतो; ज्यामध्ये तुमच्या खात्यात पैसे पटकन ट्रान्सफर केले जातात, तेही अवघ्या काही तासांत. त्यामुळे कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना लवकर पैसे मिळतात.

पर्सनल लोनसाठी अर्ज कसा करायचा (How To Apply For Personal Loan )?

१. नोंदणी करा आणि माहिती प्रदान करा : पर्सनल लोनसाठी (वैयक्तिक कर्ज) अर्ज करायचा असेल, तर सुरुवातीला आधार कार्ड, पॅन कार्डशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर करा.

२. पात्रता : तुम्ही तुमची माहिती सबमिट केल्यावर, बँकेकडून तुमची पर्सनल माहिती व्हेरिफाय केली जाईल आणि त्यानंतर बँक कर्जासाठी तुम्ही पात्र आहात का याचे मूल्यांकन करील.

हेही वाचा…Maharashtra Assembly Seats : महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? जिल्ह्यानुसार सर्व जागांची यादी एका क्लिकवर वाचा

३. कर्जाची रक्कम आणि परतफेडचा कालावधी : कर्ज घेण्यास तुम्ही पात्र आहात हे निश्चित झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी निवडू शकता.

४. खात्यात पैसे होतील जमा : अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्जाची रक्कम काही तासांत तुमच्या खात्यात जमा केली जाते. काही प्रकरणांमध्ये निधी जमा होण्यासाठी २४ ताससुद्धा लागू शकतात.

पर्सनल लोन घेण्यासाठी काय आहे पात्रता :

१. वय : पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे असावे. काही बँकांमध्ये अर्जदारांचे वय २१ वर्षे असणे आवश्यक असते.

२. सीबीआयएल स्कोअर : चांगला क्रेडिट स्कोअर असणे महत्त्वाचे आहे. बहुतेक बँका ७०० पेक्षा जास्त स्कोअर चांगला मानतात; ज्या कमी व्याजदर सुरक्षित करण्यातदेखील मदत करू शकतात.

३. उत्पन्नाचा स्रोत : जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल, तर तुम्ही तुमच्या सध्याच्या मालकाकडे किमान एक वर्ष तरी काम केलेलं असलं पाहिजे. तसेच स्वतःचा व्यवसाय असल्यास उत्पन्नाचा स्रोत दाखविणे आवश्यक आहे.

पर्सनल लोन घेण्याचे फायदे :

१. वैयक्तिक कर्जाचा एक मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला कोणतेही तारण ठेवण्याची गरज नाही.

२. अचानक पैशांची गरज भासल्यास वैयक्तिक कर्ज हा एक योग्य पर्याय असू शकतो. कारण- काही तासांत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात.

३. तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती आणि क्षमतेनुसार परतफेडीचे पर्याय निवडू शकता. अनेक बँका तुम्हाला फोरक्लोजर शुल्क न आकारता, लवकर कर्ज फेडण्याची परवानगी देतात.

४. पर्सनल लोन काढण्यासाठी तुम्ही बँकेत लांबच्या लांब रांगेत उभे न राहता, वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.