How to apply for Maharashtra Ration Card Online: रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्ड असलेल्या लोकांना परवडणाऱ्या किमतीत विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्नधान्य सरकारकडून दिले जाते. तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल व तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल, तर तुम्ही घसबसल्या रेशन कार्ड बनवून घेऊ शकतात. ऑनलाइन रेशन कार्ड बनवून घेण्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेऊयात.

रेशन कार्डचे प्रकार

  • पिवळे रेशन कार्ड – दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे (बीपीएल)
  • केशरी रेशन कार्ड – १५ हजार रुपयांपेक्षा जास्त, पण एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेली कुटुंबे
  • पांढरे रेशन कार्ड – एक लाख रुपये आणि त्याहून जास्त उत्पन्न असलेली कुटुंब

पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाइन अन् ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

How to Apply for PM Awas Yojana
पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाइन अन् ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
TRAGIC! Hyderabad Youth Falls Off 3rd Floor Of Hotel Building While Trying To Shoo Away Dog
मृत्यू आपल्याला कसा जाळ्यात ओढतो पाहा; तरुणाच्या मृत्यूचा थरारक VIDEO बघून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
What is the meaning of o in o clock
O’clock Meaning: घड्याळातील वेळ दर्शविण्यासाठी ‘O’clock’ असे का म्हणतात? हे आहे कारण
Bigg Boss 18 Chahat Pandey Proposed marriage to salman khan
Bigg Boss 18: चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
How to Update New mobile Number in Ration Card
नवीन मोबाइल नंबर घेतलाय, मग तो रेशन कार्डमध्ये अपडेट कसा करायचा? जाणून घ्या

रेशन कार्ड बनवण्यासाठी पात्रता (Eligibility for Ration Card)

  • अर्जदाराकडे महाराष्ट्रातील किंवा इतर कोणत्याही राज्यातील रेशनकार्ड नसावे.
  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरुपी रहिवासी असावा.
  • रेशन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या उत्पन्नासंदर्भातील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे (Documents for Ration Card)

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • विज बिल
  • घर भाड्याची पावती
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचे फोटो

लग्नाची ऑनलाइन अन् ऑफलाइन नोंदणी कशी करायची? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या

रेशन कार्डचे फायदे (Benefits of Ration Card)

  • अन्नधान्य सवलतीच्या दरात मिळते.
  • रेशन कार्ड हे भारतातील अधिकृत ओळखपत्र आहे.
  • पॅनकार्डसाठी अर्ज करताना हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येते.
  • नवीन एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी रेशन कार्ड वापरता येते.
  • रेशन कार्डचा वापर बँक खाते उघडण्यासाठी आणि बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • नवीन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी वापरता येते.

भारतात पहिला कॉल कोणी कोणाला केला होता? एक मिनिट बोलण्यासाठी यायचा ‘इतका’ खर्च

रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

  • रेशन कार्ड बनवण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • तिथे साईन इन किंवा रजिस्टर पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर Public Login या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर New User Sign Up Here वर क्लिक करा
  • नवीन रेशन कार्डसाठी ‘Want to apply for New Ration Card’ वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला स्क्रीनवर मागितलेली सर्व माहिती अचूक भरा. त्यानंतर तुमचा युजर आयडी व पासवर्ड तयार करा.
  • त्यानंतर Register User वर क्लिक करून आपले युजर आयडी व पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करा.त्यानंतर कॅप्चा निट भरा आणि Get OTP या ऑप्शनवर क्लिक करा.
  • ओटीपी टाकल्यानंतर Submit ऑप्शनवर क्लिक करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या वेबसाईटवर तुमचे अकाउंट उघडेल.
  • अकाऊंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इनवर जाऊन रजिस्टर्ड युजर या ऑप्शनवर क्लिक करा. पुन्हा लॉग इन, पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • आता अॅप्लिकेशन रिक्वेस्टमध्ये ‘Apply For New Ration card’ वर क्लिक करा आणि तिथे मागितलेली माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
  • त्यानंतर Submit For Payment वर क्लिक करून शुल्क भरा.
  • ऑनलाइन फी जमा केल्यावर तुमची माहिती पडताळणीसाठी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे जाईल. तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड मिळेल.