कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. तसेच फोटो, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा यासाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकाचा एक लाख रूपयांपासूनच्या पुढील व्यवहारासाठी पॅनकार्ड सत्कीचे करण्यात आले आहे. दररोजच्या वापरात महत्वाचं असणारं पॅनकार्ड तुम्हाला स्वत: जाऊन काढणे शक्य नसल्यास ऑनलाइनही काढता येते. त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम -प्रथम https://india.gov.in/apply-online-new-pan-card िया संकेतस्थळावर जावे. तिथे पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या लिंकवर क्लिक करावे.
  • याच संकेतस्थळावरून पॅनकार्डसाठीचा अर्ज डाउनलोड करून घ्यावा.
  • या अर्जात विचारल्याप्रमाणे दिलेली माहिती भरावी.
  • माहिती भरल्यानंतर तुम्हाला पॅनकार्ड काढण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल. ही रक्कम क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्हाला भरावी लागेल.
  • अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता, आवश्यक असणारी कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो याबाबतची माहिती असणारे पत्र देण्यात येईल.
  • तुम्ही ही कागदपत्रे पाठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाकिटावर विषयामध्ये पॅनकार्डसाठी अर्ज आणि तुम्हाला मिळालेल्या माहितीपत्रावरील क्रमांक टाकावा.
  • पुढील पंधरा दिवसांत तुम्हाला तुमचे पॅनकार्ड मिळेल. ते न मिळाल्यास तुम्ही https://tin.tin.nsdl.com/tan/servlet/PanStatusTrack या संकेतस्थळाला भेट देऊ शकता व पुढील माहिती मिळवू शकता.

हे ही वाचा : पॅनकार्ड हरवलंय? असं काढा डुप्लिकेट 

 How to Check : पॅनकार्डची वैधता तपासण्याची सोप्पी पद्धत