How to Become a Pilot : लहानपणी आकाशात विमान पाहून अनेकांना आपणही त्या विमानाचा पायलट व्हावं असं कधी तरी वाटलं असेल. तुम्ही विमान चालवण्याचे स्वप्न पाहत आहात का? किंवा तुम्हाला पायलट व्हायचे आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण पायलट कसे बनायचे, याविषयी जाणून घेणार आहोत. पायलट बनायचे असेल तर योग्य फ्लाइंग स्कूल निवडणे हे पायलट होण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमचा करिअरचा मार्ग निवडा

पायलटचे विविध प्रकार आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारचा पायलट बनायचे आहे हे आधी ठरवा.

१. कमर्शियल पायलट (CPL) : कमर्शियल पायलटला विमान उड्डाण करता आले पाहिजे; या पायलटचा कोर्स पूर्ण करण्यासाठी १८-२४ महिने लागतात.

खाजगी पायलट (PPL) : खाजगी पायलटला खाजगी विमानाचे पायलट म्हणून काम करण्याची परवानगी मिळते, त्यासाठी खाजगी पायलट परवाना (पीपीएल) मिळवावे लागते.

एअरलाइन कॅडेट प्रोग्राम : एअरलाइन कॅडेट प्रोग्राम हा पायलट बनण्यासाठीचा एक प्रशिक्षण कार्यक्रम असतो. याद्वारे शिक्षण पू्र्ण झाल्यानंतर जॉब प्लेसमेंटसह प्रशिक्षण दिले जाते.

पायलट बनण्यासाठी भारतातील DGCA-मान्य फ्लाइंग स्कूलमधून कमर्शियल पायलट परवाना (CPL) मिळवणे आवश्यक आहे.

पात्रता तपासा

भारतातील फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत.

  • वय : कमर्शियल पायलटसाठी किमान १७ वर्षे आणि खाजगी पायलटसाठी किमान १६ वर्ष वय असावे.
  • शिक्षण : भौतिकशास्त्र आणि गणितासह १०+२ शिक्षण असावे (विज्ञान शाखेत शिक्षण न घेतलेले विद्यार्थीसुद्धा हा कोर्स करू शकतात)
  • मेडिकल फिटनेस : DGCA मान्यताप्राप्त क्लास १ मेडिकल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • इंग्रजी भाषेचे ज्ञान : इंग्रजी उत्तम वाचणे, लिहिणे आणि या भाषेत संवाद साधता आला पाहिजे.

योग्य फ्लाइंग स्कूल निवडणे

भारतात ३० हून अधिक DGCA-मान्यताप्राप्त फ्लाइंग स्कूल आहेत, पण तुमच्यासाठी योग्य फ्लाइंग स्कूल निवडणे आवश्यक आहे.

  • DGCA मान्यता : वैध प्रमाणपत्रासाठी स्कूल मान्यताप्राप्त असल्याची खात्री करा.
  • प्रशिक्षण विमान आणि सिम्युलेटर : पायलट प्रशिक्षण देण्यासाठी एअरक्राफ्ट सिम्युलेटर आणि फ्लाइट सिम्युलेटरचा वापर केला जातो. या सिम्युलेटरमुळे पायलटचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान उड्डाणाचा सराव करण्यास मदत होते.
  • प्रशिक्षण खर्च : कमर्शियल पायलटच्या प्रशिक्षणाचे शुल्क ३५ ते ५० लाखांच्यादरम्यान असते. यासाठी तुम्ही कर्ज किंवा स्पॉन्सरशिप पर्याय वापरू शकता.
  • हवामानाची स्थिती : फ्लाइंग स्कूल निवडताना अनुकूल हवामानाची स्थिती पाहा, जेथे तुम्हाला उड्डाण प्रशिक्षणात अडथळा येणार नाही.
  • जॉब प्लेसमेंट : काही स्कूल जॉब प्लेसमेंटसाठी मदत करतात.

फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश घ्या आणि प्रशिक्षण सुरू करा

  • सुरुवातीला अर्ज करा आणि प्रवेश परीक्षा पास करा (आवश्यक असल्यास)
  • त्यानंतर DGCA क्लास 1 मेडिकल टेस्ट उत्तीर्ण व्हा.
  • ग्राउंड स्कूल ट्रेनिंग पूर्ण करा. (एव्हिएशन थेअरी, एअर रेग्युलेशन, नेव्हिगेशन).
  • फ्लाइट ट्रेनिंग सुरू करा.
  • कमर्शियल पायलटसाठी २०० हून अधिक फ्लाइंग तास गरजेचे आहेत.
  • हवामान आणि उपलब्ध फ्लाइट स्लॉटवर अवलंबून, पायलट प्रशिक्षणास १८-२४ महिने लागतात.

पायलट परवाना मिळवा

  • कमर्शिअल पायलट लायसन्स (CPL) मिळविण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत.
  • DGCA थेअरी परीक्षा उत्तीर्ण
  • RTR (Radio Telephony Restricted) परीक्षा पास करा
  • २०० हून अधिक उड्डाण तास पूर्ण करा
  • DGCA स्किल टेस्ट उत्तीर्ण करा
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to become a pilot from flying schools to get pilot license read fees time and eligibility ndj