Step by Step Guide on How to Buy FASTag : राज्यात १ एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टॅग नसणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे हा भुर्दंड टाळण्याकरता तुम्ही जर अद्याप फास्टॅग सुरू केले नसेल तर आताच फास्टॅग खरेदी करा.
टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि महामार्गांवरून विनाअडथळा वाहतुकीसाठी फास्टॅग प्रणाली २०१९ पासून सुरू करण्यात आली आहे. १ डिसेंबर २०१९ पासून देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आला. तर, राज्यात सर्व टोलनाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. हा फास्टॅग एखाद्या स्टिकरसारखा असून कारच्या पुढच्या काचेवर लावला जातो. रोख पैशांचा व्यवहार न करता टोल भरण्याकरता या फास्टॅगचा वापर केला जातो. फास्टॅगमुळे गाड्यांना टोलनाक्यावर फारवेळा थांबावे लागत नाही, परिणामी वाहतूक कोंडी कमी होत. तसंच, यामुळे सरकारडे प्रत्येक गाडीचा डिजिटल रेकॉर्ड तयार होतो.
फास्टॅग कुठून खरेदी कराल?
- वाहनधारकांना सहजपणे फास्टॅग मिळावे याकरता सरकारने अनेक तरतुदी करून ठेवल्या आहेत. बँका, इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी, राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणासारख्या ठिकाणी फास्टॅगची विक्री केली जाते. तसंच, आरटीओ कार्यालय, सर्व सेवा केंद्र,वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवरही हे फास्टॅग उपलब्ध असतात.
- तसंच, अॅमेझॉन, पेटीएम, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयडीएफसी बँक यांच्या वेबसाईटवरूनही ऑनलाईन फास्टटॅग तुम्ही विकत घेऊ शकता.
- तुमच्या जवळचं फास्टॅग केंद्र शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर My FASTag App डाऊनलोड करू शकता.
फास्टॅग कसं कार्यरत कराल?
- एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिक बँकेच्या संकेतस्थळावर जा
- अॅमेझॉन, पेटीएम, फ्लिपकार्टसारखे संकेतस्थळावरूनही तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता
- या संकेतस्थळांवर गेल्यावर Fastag किंवा Buy Fastag वर क्लिक करा.
- तिथे तुमच्या वाहनाची आणि खातेसंबंधित माहित भरा
- आवश्यक कागदपत्रांचे छायाचित्र अपलोड करा.
- शुल्क भरा आणि सबमिट करा.
ऑफलाईन कसे अर्ज कराल?
- जवळच्या फास्टॅग डीलरकरडे जा.
- आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि फॉर्म भरा.
- शुल्क भरा आणि फास्टॅग घ्या.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
- वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्रे (RC)
- ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सन वगैरे)
- पत्त्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- वाहनमालकाचे पासपोर्ट साईज फोटो
हेही लक्षात ठेवा
- फास्टॅग ५ वर्षं वैध असेल.
- टोलनाक्यापासून १० किलोमीटरच्या परिघात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला टोलमधून सूट मिळते.
- कॅशबॅकच्या स्वरुपात ही सूट तुमच्या खात्यात पुन्हा जमा होते.
- जर तुमच्याकडे दोन गाड्या असतील तर तुम्हाला दोन्ही वाहनांसठी वेगवेगळे फास्टॅग घ्यावे लागतील.