अनेकांना युपीआय पिन बदलण्यासाठी मोठी प्रक्रिया असते असा समज असतो. एकदा युपीआय आयडी बनवण्यात आला तर तो पुन्हा एडिट करता येत नाही, त्यासाठी नवा युपीआय आयडी बनवावा लागेल असे अनेकांचे मत असते. पेटीएमवर सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही युपीआय आयडी सहज बदलू शकता, जाणून घ्या या स्टेप्स.
पेटीएमवरून युपीआय आयडी बदलण्यासाठी वापरा या स्टेप्स
आणखी वाचा : व्हॉटसअॅपवरील Video Call रेकॉर्ड करायचाय? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स
- तुमच्या स्मार्टफोनमध्ये पेटीएम अॅप उघडा
- पेटीएम प्रोफाइल या डाव्या बाजुला असणाऱ्या पर्यायावर जा.
- त्यामध्ये युपीआय अँड पेमेंट या पर्यायावर क्लीक करा.
- प्रायमरी बँक अकाउंट डिटेल या पर्यायामध्ये असणारा चेंज पिन हा पर्याय निवडा.
- त्यापुढील प्रक्रियेमध्ये डेबिट कार्ड डिटेल्स भरा, जर तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तर तुम्ही ‘I remember my old UPI Pin हा पर्याय निवडा.
- तुम्ही डेबिट कार्ड डीटेल्स दिल्यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी दिलेल्या पर्यायामध्ये भरा. जर तुम्ही दुसरा पर्याय निवडला असेल तर या स्टेपची गरज भासणार नाही.
- आता दिलेल्या पर्यायामध्ये नवा युपीआय पिन टाका, अशाप्रकारे तुमचा नवा युपीआय आयडी तयार केला जाईल.