Step-By-Step Guide to convert Jio SIM to eSIM : तंत्रज्ञानात रोज नवी प्रगती होताना दिसते आहे. अशातच एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे जो आहे ई सीम. ई सीम चं नवं तंत्रज्ञान आलं आहे. तुमचं जिओ सिम ई सिममध्ये कसं रुपांतरित कराल हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी ई सिम म्हणजे काय ते समजून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ई सिम म्हणजे नेमकं काय?

ई-सिम म्हणजे ‘एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल’ तुम्ही हे सिमकार्ड पाहू शकत नाही. इ सिम हे एक व्हर्च्युअल सिम आहे जे फिजिकल सिमपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. तुम्ही हे सिम खरेदी केल्यांनतर तुम्हाला ते मोबाईल मध्ये टाकावं लागत नाही. हे टेलिकॉम कंपनीद्वारे ओव्हर-द-एअर ऍक्टिव्हेट केले जाते. नॉर्मल सिम कार्डमध्ये ज्या काही सुविधा असतात त्या सर्व सुविधा तुम्हाला इ सिम मधेही मिळतात.

E-Sim चे फायदे काय आहेत?

ई-सिमचे फायदे सुद्धा अनेक आहेत. हे सिम मोबाईलच्या हार्डवेअरमध्येच असते. त्यासाठी वेगळा सिम ट्रे बनवण्याची गरज कंपनीला लागत नाही. त्यामुळे मोबाइलची ती जागा वाचते. ई सिम वापरण्यासाठी मोबाईल मध्ये ड्युअल सिम सुविधा असणे आवश्यक आहे. ई- सिमचा अजून एक फायदा म्हणजे यूजर्स त्यांच्या फोनमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक सिम वापरू शकतील.

ई-सिम कार्ड कसे खरेदी कसं करायचं?

तुम्ही सुद्धा ई-सिम कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला नेटवर्क ऑपरेटरकडे जावे लागेल. या व्यतिरिक्त, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा वेबसाइटवरून किंवा अनुप्रयोगाद्वारे ई-सिम कार्ड देखील खरेदी करू शकता.

जिओ सिमचं रुपांतर ई सिममध्ये कसं करता येईल?

१) सर्वात आधी तुमच्या फोनला ई सिम सपोर्ट करतं ना? हे तपासा ते करता येणार असेल तर तुम्हाल जिओ सिमचं रुपांतर ई सिममध्ये करता येईल.

२) तुमच्या जिओच्या कार्यरत असलेल्या सिम क्रमांकावरुन १९९ या क्रमांकांवर GETESIM असा मेसेज करा. त्या मेसेजमध्ये तुमचा इमेल आयडी लिहायला विसरु नका.

३) तुम्हाला ईसिम हवं आहे का? हे विचाराणारा रिप्लाय येईल त्यावर YES हा रिप्लाय पाठवा.

४) त्यानंतर तुम्हाला तुमच्या अधिकृत ई मेल आयडीवर मेल येईल, ज्यात QR Code असेल.

५) हा कोड आल्यानंतर तुमच्या मोबाइलच्या सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथे मोबाइल प्लान तुम्हाला अॅड करायचा आहे. त्यावेळी तुम्हाला मेलवर आलेला QR Code स्कॅन करायचा आहे. ज्यानंतर तुमचं ई सिम अॅक्टिव्हेट होईल.

६) क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला सूचनांप्रमाणे पुढील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. ज्यानंतर तुमचं ईसिम अॅक्टिव्हेट होईल ते अॅक्टिव्हेट झाल्यानंतर तुमचं जिओ सिम आपोआप डिअॅक्टिव्हेट होईल. तुमचं ई सिम अॅक्टिव्हेट झालं आहे हे सांगणारा मेसेज तुम्हाला येईल.