How To Check LPG Gas Cylinder Expiry Date : जेव्हा तुम्ही बाजारातून खाण्याचे सामान आणि औषधे खरेदी करता, तेव्हा त्याची एक्सपायरी डेट नक्कीच तपासून घेता. सुरक्षेच्या कारणास्तव असं करणं योग्य असतं. याशिवाय आणखी काही गोष्टी आहेत, जे एक्स्पायर होतात, पण आपण त्यावर लक्ष देत नाही. यामध्ये एक आहे आपल्या किचनमध्ये वापरण्यात येणारा गॅस सिलेंडर. तुम्हाला याबाबत जरी माहिती नसेल, पण एलपीजी सिलेंडरचीही एक्सपायरी डेट असते. सिलेंडर घेताना आपण गॅस लीक आहे की नाही, हे तपासतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची एक्सपायरी चेक करत नाही.

या जागेवर लिहिलेली असते एक्सपायरी डेट

एलपीजी सिलेंडरवर वरच्या बाजूला तीन पट्ट्या असतात. त्यावर मोठ मोठ्या अक्षरांमध्ये एक कोड लिहिलेलं असतं. हे कोड म्हणजेच सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. हा कोड A-24, B-25, C-26 किंवा D-27 असे असतात. या कोडमध्ये ABCD अक्षर महिन्यांबद्दल माहिती देतात. तर त्यामागे लिहिलेले नंबर्स वर्षांची माहिती देतात. तर जाणून घेऊयात हे कोड कशा पद्धतीने सिलेंडरची एक्सपायरी सांगतात. याला टेस्ट ड्यू डेटही म्हणतात.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

नक्की वाचा – Video: लघुशंकेला जाण्यासाठी तरुणाला एक्स्प्रेसमध्ये करावी लागली कसरत, थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केलं अन्…

ABCD चा अर्थ

ABCD मध्ये प्रत्येक अक्षराला तीन तीन महिन्यांमध्ये विभागलं गेलं आहे.
A चा अर्थ आहे – जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च
B चा अर्थ – एप्रिल, मे आणि जून
C चा अर्थ – जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
D चा अर्थ – ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर

जर तुमच्या सिलेंडरवर C-23 लिहिलं असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, तो सिलेंडर २०२३ मध्ये ऑक्टोबरपासून डिसेंबर महिन्याच्या आत एक्सपायर होईल.

यासाठी लिहिले जाते एक्सपायरी डेट

एक सिलेंडर १५ वर्षांपर्यंत टिकतो. या कालावधीत त्याची दोनवेळा तपासणी केली जाते. पहिली १० वर्षांनंतर आणि दुसरी ५ वर्षांनंतर. सिलेंडरवर लिहिलेली त्याची एक्सपायरी डेटही त्याची टेस्टिंग डेट असते. या तारखेनंतर सिलेंडरला पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवलं जातं आणि हा सिलेंडर पाहून तपासलं जात की, याचा वापर पुन्हा होऊ शकतो की नाही.