तुमचा भविष्य निर्वाह निधी किती जमा झाला आहे. व्याजदर योग्य प्रमाणात मिळते आहे की नाही. तुम्हाला त्यातून किती उचल घेता येईल, खात्यावर कितीपैसे आहेत. वगैरे असंख्य प्रश्नांची उत्तरे आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) खातेदारांना चार वेगवेगळ्या पद्धतीनं मिळणार आहे.

या चार प्रकारे पीएफचा बॅलन्स तपासता येईल… 
१) वेबसाईट
२) अॅप
३) एसएमएस
४) मिस कॉल

public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
pimpri chinchwad property tax marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच लाख मालमत्ताधारकांनी बुडविला कर
mhada launch special campaign for sale of 11176 houses on first come first serve from 2nd december
म्हाडाच्या विशेष मोहिमेला अखेर चांगला प्रतिसाद; ५५०० जणांकडून घरासाठी चौकशी, प्रत्यक्षात २५० जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज केले दाखल
land records department will provide online property title change notices to postal department
मालमत्तेसबंधीत टपाल विभागाला ऑनलाईन नोटीस… काय होणार परिणाम ?
Central Electronics Limited Recruitment 2024: Application Begins For Junior Technical Assistant And Technician Posts, Check Details
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती, मिळणार ७५ हजारपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
SBI Clerk Recruitment 2024 Notification 2024 released for recruitment of Junior Associates at sbi.co.in
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती; इच्छुक उमेदवारांनी लगेच करा अर्ज; अर्जाची लिंक बातमीत

जाणून घेऊयात वरील चार पद्धतीची माहिती, ज्याद्वारे पीएफ खात्यावरील जमा रक्काम तपासली जाईल

१) वेबसाईट

वेबसाईटवर तुमचा पीएफ खात्यातील बॅलन्स चेक तपासण्यासाठी ईपीएफच्या https://epfindia.gov.in/site_en/index.php या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यासाठी तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिवेट केलेला असण्याची गरज आहे. हा क्रमांक ईपीएफओ देतं व एम्प्लॉयर तो अॅक्टिवेट करतो. नोकरी बदलली तरी हा युएएन क्रमांक बदलत नाही, तो कायम राहतो. तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाइलच्या माध्यमातून तुम्ही या पोर्टलवर पासवर्ड सेट करू शकता आणि नंतर तिथं दिलेल्या सूचनांनुसार पासबुकच्या माध्यमांमधून पीएफ बॅलन्स चेक करू शकता.

ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर ‘Our Services’ टॅबवर क्लीक करा. त्यानंतर For Employees या पर्यायावर क्लीक करा

‘Services या पर्यायावर क्लीक करून ‘Member passbook’ हा पर्याय निवडावा

युएएननंबर आणि पासवर्डने लॉगइन करा

२) अॅप
ईपीएफओचं अॅप प्ले स्टोअरमध्ये असून ते डाऊनलोड करून मेंबर लॉगइनच्या ऑप्शनमधून बॅलन्स चेक करायची सोय आहे. इथंही नोंदणी असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून जोडणी केली जाते.

३) एसएमएस
केवायसी डिटेल्स पूर्ण झाले असतील तरच एसएमएसच्या माध्यमातून बॅलन्स जाणून घेता येतो. EPFOHO UAN ENG असा मेसेज टाइप करायचा ENG च्या जागी MAR टाइप केलं तर मराठीत माहिती मिळेल. आपला UAN त्यात टाकून हा मेसेज 7738-299-899

४) मिस कॉल
नोंदणीकृत मोबाइलवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यावर एसएमएस येतो आणि पीफच्या डिटेल्स तुम्हाला कळवल्या जातात.

Story img Loader