How to choose perfect umbrella: पावसाळा सुरू झाला की, सर्वांत पहिल्यांदा आठवते ती म्हणजे छत्री. दरवर्षी जून महिन्यांपासून पावसाची रिमझिम सुरु होते. पावसाळा आला की, आपल्या घरातील छत्रीचा शोध सुरू होतो. अडगळीत पडलेली छत्री सापडली तर ठीक, नाही तर पुन्हा नवी छत्री विकत घ्यायची तयारी आपल्याला ठेवावी लागते. सध्या पावसाचा हंगाम सुरु आहे. छत्री ही लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणीही सहज वापरू शकते. बाजारात छत्र्यांची नवनवीन व्हरायटी पाहायला मिळते. छत्र्यांची गरज प्रत्येकालाच भासते. हीच छत्री खरेदी करताना नेमकी कशी खरेदी करावी हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर काळजी करु नका, आम्ही तुम्हाला पावसाळ्यात योग्य छत्री कशी निवडावी? हे सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला फक्त ३ गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला तर पाहुयात..
सध्या बाजारात विविध रंगांच्या, कार्टूनच्या, प्रिंटेड, फोल्डिंग, आर्मी सिल्वर, रेम्बो छत्री, मल्टीकलर, आर्मी सिल्व्हर, फॅमिली पॅक व गार्डन छत्री, ट्रान्सपरेंट, पॉकेट छत्री, हॅट अम्ब्रेला, मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर व फ्लोरोसेंट रंगाच्या आणि आकारांच्या छत्र्या मिळतात. यातून योग्य छत्री ओळखण्यासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
छत्रीचा आकार महत्त्वाचा
छत्री खरेदी करताना छत्रीचा आकार सर्वात महत्त्वाचा आहे. जेव्हा छत्रीचा विचार केला जातो तेव्हा आकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. यावेळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी रुंद छत असलेली छत्री निवडा. एक मोठी छत्री मुसळधार पाऊस आणि वार्यापासून तुम्हाला चांगले संरक्षण देते, त्यामुळे मुसळधार पावसातही तुम्ही कोरडे राहू शकता.
टिकाऊपणा
पावसाळ्यात छत्री उडून जाण्याचे अनेक घटना आपण पाहिल्या आहेत, त्यामुळे मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यातही छत्री टिकून राहण्यासाठी छत्रीचा टिकाऊपणा तपासून पाहा. त्यामुळे छत्री निवडताना टिकाऊपणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. फायबरग्लास किंवा स्टील फ्रेम्स सारख्या मजबूत सामग्रीपासून बनवलेल्या छत्र्या निवडा.
हेही वाचा – मुंबईत स्वस्तात मस्त खरेदी करायचीय? मग Street Shopping ‘या’ १० मार्केट्सना नक्की भेट द्या …
वॉटर फॅब्रिक
पावसाळ्यात काही छत्र्या असून नसल्यासारख्या असतात, कारण काहीच दिवसात त्या गळायला सुरु होतात. त्यामुळे छत्री निवडताना छत्रीचं फॅब्रिक तपासून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोरडे ठेवण्यासाठी छत्रीचे फॅब्रिक महत्वाचे आहे. पॉलिस्टर किंवा नायलॉनसारख्या जलप्रतिरोधक सामग्रीपासूनछत बनवलेल्या छत्र्या निवडा, हे कापड जलद वाळवणारे असते.
या टीप्स तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील याची खात्री आहे.