‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'( IRCTC) रेल्वे प्रवाशांना ऑनलाइन तिकीट आरक्षित आणि रद्द करण्याची सेवा पुरवते. यासाठी युजर्स मोबाइल किंवा लॅपटॉपद्वारे आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर लॉग-इन करु शकतात. या ऑनलाइन सेवेचा लाभ घेण्यासाठी आयआरसीटीसीचं मोबाइल अॅप देखील डाउनलोड करता येतं. जर तुम्हालाही आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अकाउंट बनवायचं असेल तर काही सोप्या स्टेप्स फॉलो करा…
कसं बनवायचं अकाउंट?
– अकाउंट बनवण्यासाठी सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या irctc.co.in या संकेतस्थळावर जा
– संकेतस्थळाच्या अगदी वरती साइन अप किंवा रजिस्ट्रेशन या पर्यायवर क्लिक करा
– अकाउंट बनवण्यासाठी विचारलेली सर्व माहिती भरा
– येथे योग्य युजरनेम आणि पासवर्ड विचारला जाईल
– यानंतर सिक्युरिटी प्रश्न निवडा
– तुमचं नाव, लिंग, जन्मतारीख आणि लग्न झालेलं आही किंवा नाही हे भरा
– यानंतर लॉग-इन करण्यासाठी इमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक काळजीपूर्वक भरा
– तुमच्या घराचा पूर्ण पत्ता आणि पिन कोड देखील टाका
– यानंतर चौकटीत दिसणारे आकडे किंवा अक्षरं (Captcha) भरा आणि सब्मिट बटणावर क्लिक करा.
कसं बुक करायचं ऑनलाइन तिकीट?
– irctc.co.in वर आयडी-पासवर्ड टाकून लॉग-इन करा
– त्यानंतर Train Ticketing पर्यायाद्वारे Plan my journey या पर्यायावर क्लिक करा
– नंतर ट्रेन, प्रवासाची तारीख निवडा
– यानंतर क्रेडिट /डेबिट/युपीआय/पेटीएमद्वारे तिकिटाच्या पैशांचा भरणा करा आणि तिकिट कन्फर्म करा
– बुकिंगनंतर तुम्हाला आरक्षणाचा संदेश मोबाइलवर येईल. याशिवाय आयआरसीटीसीकडून तुमच्या इमेल आयडीवरही तिकीट पाठवले जाते.
तिकीट कॅन्सल किंवा रद्द करण्यासाठी काय करायचं?
– ज्याप्रमाणे तुम्ही आयआरसीटीसीच्या अॅपद्वारे तिकीट बुक करतात, त्याचप्रमाणे तिकीट ऑनलाइन रद्दही करता येईल
– तिकीट रद्द करण्यासाठी irctc.co.in वर जा
– त्यानंतर Booked Tickets पर्याय निवडा
– नंतर जे तिकीट रद्द करायचं असेल त्यावर क्लिक करा
– तिकीट रद्द झाल्यानंतर तुमच्या मोबाइलवर मेसेज पाठवला जातो. नंतर 3-4 दिवसांमध्ये रद्द करण्यासाठीचे पैसे आकारुन तुम्हाला रिफंड मिळते.
अनेकांपैकी एकाचेच तिकीट रद्द करायचे असल्यास काय कराल?
आपण अनेकदा एकापेक्षा अधिक जणांचे तिकीट एकाचवेळी बुक करताे. पण त्यातील कोणी सोबत येऊ शकत नसेल तर त्या एका किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तिचे तिकीट/बुकिंग कॅन्सल करता येते. त्यासाठी तिकीट कॅन्सल करायच्या सर्व स्टेप्स फॉलो करा. पण, सर्वांचे तिकीट कॅन्सल न करता ज्या व्यक्ती प्रवास करू शकणार नाहीत, त्यांच्याच नावासमोर टीक करून तिकीट कॅन्सल करा. पण, हे करत असताना उर्वरित जणांच्या तिकिटाची नवी प्रिंटआऊट किंवा ई-स्लीप घ्यायला विसरू नका.