How To Deactivate Instagram Account : अलीकडच्या काळात सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण सोशल मीडियावर सक्रिय असतात. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या अ‍ॅप्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इन्स्टाग्रामचं Reel फिचर साधारण चार वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता या अ‍ॅपवर सक्रिय असणारा प्रत्येक युजर रील्स, साधे व्हिडीओ, विविध पोस्ट्स शेअर करत असतो. मात्र, अनेकदा सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ट्रोलिंग किंवा मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. अशावेळी युजर्स इन्स्टापासून ब्रेक घेणं पसंत करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सायबर सुरक्षेच्या कारणास्तव आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट पूर्णत: डिअ‍ॅक्टिव्हेट करण्याआधी एक प्रक्रिया पार पाडावी लागते. जर तुम्हालाही सोशल लाइफपासून ब्रेक हवा असेल, तर तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट ‘या’ पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही डिअ‍ॅक्टिव्हेट करू शकता.

हेही वाचा : मार्गेरिटा पिझ्झाच्या नावाचं इटलीच्या राणीशी आहे खास कनेक्शन, वाचा १३५ वर्षांपूर्वीची रंजक गोष्ट

इन्स्टाग्राम अकाऊंट Deactivate करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा…

  • सगळ्यात आधी तुम्हाला स्मार्टफोनमध्ये इन्स्टाग्राम अ‍ॅप ओपन करावा लागेल किंवा डेस्कटॉपवर तुम्ही https://www.instagram.com या लिंकवर जा.
  • तुम्हाला जे अकाऊंट बंद करायचंय त्या अकाऊंटवर लॉगिन करा.
  • यानंतर तुमच्या प्रोफाइलवर जा. याठिकाणी उजव्या कोपऱ्यात सेटिंग्जचा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
  • सेटिंग्ज आणि प्रायव्हसी या पर्यायवर क्लिक करा.
  • तुम्हाला सेटिंग्जमध्ये सर्वात वर अकाऊंट सेंटर हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • यानंतर पर्सनल डिटेल्स ( Personal Details ) हा पर्याय निवडा.
  • पुढे, युजर्सला स्क्रीनवर ‘सिलेक्ट अकाऊंट ओनरशिप अँड कंट्रोल’ हा पर्याय दिसेल यावर क्लिक केल्यावर पुढे ‘Select Deactivation or deletion’ असं दिसेल.
  • इन्स्टाग्राम तुमचं अकाऊंट डिलीट करताना पुन्हा एकदा तुमची परवानगी मागेल. यावेळी तुम्ही इन्स्टाग्रामपासून नेमका का ब्रेक घेत आहात याचा पर्याय निवडावा लागतो. याबाबत कंपनीकडून काही ऑटोजनरेटेड पर्याय दिले जातात. ( उदा. प्रायव्हसी कारणास्तव, दुसऱ्या अकाऊंटमुळे, नीड अ ब्रेक फ्रॉम सोशल मीडिया इत्यादी)
  • तुम्हाला पुन्हा साइन-इन करून अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेटशन पर्याय निवडून कन्फर्मवर क्लिक करावं लागेल.
  • तुमचं अकाऊंट यानंतर इन्स्टाग्रामकडून निष्क्रिय केलं जाईल. तुम्हाला तुमचं खातं कायमचं बंद करायचं असेल तर ३० दिवस वाट पाहावी लागेल. या ३० दिवसात तुम्ही तुमचं अकाऊंट पुन्हा एकदा रिस्टोअर करू शकता. अनेकदा या प्रक्रियेला ९० दिवस सुद्धा लागू शकतात. याशिवाय यामध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे इन्स्टाग्राम अकाऊंट तात्पुरतं बंद करणे आणि दुसरा पर्याय इन्स्टाग्राम अकाऊंट कायमस्वरुपी बंद करणं. खालील दिलेल्या लिंकवर थेट जाऊन युजर्स त्यांचं अकाऊंट कायमस्वरुपी बंद करू शकतात. https://www.instagram.com/accounts/remove/request/permanent/
  • याशिवाय इन्स्टाग्राम युजर त्यांचं खातं आठवड्यातून केवळ एकदाच निष्क्रिय करू शकतात.

अशाप्रकारे या सोप्या स्टेप्स फॉलो करून युजर त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट ( Instagram Account ) तात्पुरतं बंद किंवा कायमस्वरुपी निष्क्रिय करू शकतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to deactivate instagram account or close permanently on mobile know the steps sva 00