Ration Card KYC Update : आधार कार्ड, पॅनकार्डप्रमाणे रेशनकार्ड हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. आज देशातील बहुतांश लोकांकडे रेशन कार्ड आहे. या रेशन कार्डचे तीन प्रकार आहे, पांढरं, केशरी आणि पिवळं. यापैकी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना सरकारकडून मोफत किंवा परवडणाऱ्या किंमतीत अन्नधान्य दिले जाते. दरम्यान याच रेशन कार्डसंदर्भात सरकारने एक महत्वाची माहिती जारी केली आहे, जी तुमच्यासाठी देखील तितकीच महत्वाची आहे, अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद केले जाऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला रेशन दुकानांवर मोफत किंवा स्वस्त दरातील धान्य मिळणं बंद होईल. अनेक गरजू लोकांपर्यंत हे धान्य पोहोचावे आणि गैरवापर रोखता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे प्रत्येक रेशन कार्डधारकांना आता ३१ जिसेंबर २०२४ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजेच दोन महिन्यांच्या या कालावधीत तुम्ही केवायसी पूर् करुन घेऊ शकता.

रेशन कार्डची ई- केवायसी कसे करायचे?

१) सर्वप्रथम तुम्ही रेशनकार्ड घेऊन तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जा.

२) रेशन दुकानात पोहोचल्यानंतर तिथला दुकानदार तुमचा अंगठा POS मशीनवर ठेवेल आणि तुमची ओळख सत्यापित करेल.

३) मशीनवर तुमचा अंगठा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

अशाप्रकारे तुम्ही दुकानात जाऊन केवायसी अपडेट करु शकता.

पण तुमच्या कुटुंबातील आणि रेशन कार्डवर नाव असलेल्यांपैकी कोणत्या व्यक्तीची केवायसी झाली किंवा झाली नाही हे तपासणे आधी गरजचे आहे. पण ते तपासायचे कसे जाणून घेऊ…

हेही वाचा – Ration Card Update : रेशन कार्डवर तुमचा मोबाईल नंबर काही मिनिटांत करा अपडेट; संपूर्ण प्रक्रिया घ्या जाणून

i

u

रेशनकार्डमधील सदस्यांची ई-केवायसी झालेली आहे की नाही, हे कसं तपासायचं? जाणून घ्या

१) सर्वप्रथम मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये जा आणि मेरा राशन नावाचे अॅप डाऊनलोड करा.

२) अॅप चालू होतात तुम्हाला स्क्रीनवर रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन दिसेल.

३) यापैकी तुम्ही आधार किंवा रेशन कार्ड दोघांपैकी एकाचा क्रमांक टाकून सबमीट बटणावर क्लिक करा.

४) यानंतर आधार सिडिंग ऑप्शनवर या.

५) आता तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावासमोर आधार सिंडिंग YES किंवा NO असं ऑप्शन दिसेल.

६) ज्या सदस्याच्या नावासमोर YES हा ऑप्शन असेल तर त्या सदस्यासा केवायसीची गरज नाही, पण NO असल्यास त्या सदस्याला केवायसी करणे गरजेचे आहे.

७) पण ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to do e kyc of ration card know step by step process detailed information in marathi how to make ekyc for ration card sjr