Documents for Birth Certificate : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जन्माच दाखला हे अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे जन्माची तारीख वठिकाण ठिकाण सांगणारे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. विविध शासकीय योजनांचा, सवलतींचा फायदा घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र महत्त्वाचे दस्तऐवज असते. आधार कार्ड, मतदान कार्ड काढण्यापासून ते शाळेत प्रवेश घेणे, विवाहाची नोंद करणे, पासपोर्ट यासाठी जन्म प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा आहे.

बाळाच्या जन्मानंतर २१ दिवसांच्या आत जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो. महाराष्ट्रात अर्ज केल्यापासून एका आठवड्यात जन्माचा दाखला मिळतो. जन्म दाखला काढण्याची ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती, त्याबद्दल जाणून घेऊयात.

What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : “महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये आणि बस प्रवास मोफत”, राहुल गांधींची गॅरंटी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Madhureema Raje Chhatrapati
Shahu Chhatrapati : “…म्हणून मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे”, अखेर शाहू छत्रपतींनी सोडलं मौन; म्हणाले…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Inconvenience to citizens due to breakdown of online system of birth death registration and issuance of certificates
जन्म-मृत्यू नोंदणीसाठी नागरिकांना हेलपाटे, हे आहे कारण!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा

हेही वाचा – ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या

जन्म दाखला काढण्यासाठी आवश्यक कागजपत्रे कोणती?

  • पालकांचे ओळखपत्र
  • जन्मस्थान सांगणारा पुरावा (रुग्णालयातील पावती)
  • पालकांच्या लग्नाचे प्रमाणपत्र (पर्यायी)

हेही वाचा – Sarpanch Salary: सरपंच व उपसरपंच यांना किती मानधन मिळतं? जाणून घ्या

जन्म नोंदणी उशीरा करत असाल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे ओळखपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आई-वडिलांचे ओळखपत्र
  • जन्म झालेल्या रुग्णालयाचे प्रमाणपत्र
  • जन्म रुग्णालयात न झाल्यास पालकांचे शपथपत्र

हेही वाचा – पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाइन अन् ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

जन्म दाखला ऑफलाइन काढण्याची प्रक्रिया

ऑफलाइन जन्म दाखला काढण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात जावे लागेल, आणि तिथून फॉर्म घ्यावा लागेल. त्या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती भरावी लागेल. नोंदणी केल्यानंतर फॉर्मबरोबर आवश्यक सर्व कागदपत्रे जोडा आणि फॉर्म सबमिट करा.

हेही वाचा –‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे? मोफत उपचार कोणत्या आजारांवर होतात, योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या

जन्म दाखला ऑनलाइन काढण्याची प्रक्रिया

  • जन्माचा दाखला काढण्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाईटवर जा.
  • त्या वेबसाईटवर साईन इनवर क्लिक करा. तिथे मागितलेली माहिती अचूक भरा, कॅप्चा कोड टाका आणि रजिस्टरवर क्लिक करा.
  • तुम्हाला ईमेलद्वारे युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  • तो युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • नंतर एक पेज उघडेल. तिथे बर्थ या पर्यायावर क्लिक करून अॅड बर्थ रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती नाव, जन्मतारीख, पत्ता, आईचे नाव, वडिलांचे नाव अचूक भरा आणि सेव्ह करा.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची फोटो कॉपी स्कॅन करून अपलोड करा आणि सेव्ह करा.
  • त्यानंतर तुम्हाला अर्जाचा प्रिव्ह्यू दिसेल, तिथे एकदा सगळी माहिती अचूक आहे की नाही ते तपासून घ्या.
  • नंतर तुम्ही सबमिट केल्यावर ऑनलाइन अर्जाची पावती मिळेल. त्याची प्रिंट काढून ठेवा. तुम्ही अर्ज केल्यावर एका आठवड्यात तुम्हाला जन्माचा दाखला मिळेल.