स्मार्टफोन्स ही आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातील गरज झाली आहे. फक्त संवाद साधण्यापुरता मोबाईलचा उपयोग मर्यादीत राहिलेला नाही. आता मनोरंजनासाठी स्मार्टफोन्सचा वापर होत मोठ्याप्रमाणात केला जात आहे. तसेच स्मार्टफोनमुळे ज्ञानात भर टाकणारी माहिती एका क्लिकवर मिळवणे सहज शक्य आहे. आता स्मार्टफोन्सवर बँकेचे व्यवहार देखील चुटकीसरशी करता येतात. स्मार्टफोन्सशिवाय एक दिवस राहण्याचा विचार देखील आपण करू शकत नाही. पण जर तुमचा स्मार्टफोन्स फोन चोरीला गेला तर? तुमचा फोन हॅक झाला तर?
तुमच्या फोनमध्ये असणारी तुमची वैयक्तिक माहिती फोटो, कागदपत्रे, बँकेसंबंधी माहिती चुकीच्या लोकांच्या हाताला लागली तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणूनच चोरी आणि हॅकींगपासून तुमच्या स्मार्टफोनला सुरक्षित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. स्मार्टफोनची चोरी रोखण्यासाठी आणि चोरी झालेल्या स्मार्टफोनचे ट्रॅक करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या आणि त्यांचे गुगल आणि अॅपलसारख्या ऑपरेटिंग सिस्टम उत्पादक देखील अनेक पावले उचलत आहेत. Android वापरकर्त्यांना पासवर्डसह स्मार्टफोनला पॉवर ऑफ असतानाही संरक्षण देते जेणेकरून जर स्मार्टफोन चोरी झाला तर सहज शोधता येईल. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना त्यांचे स्मार्टफोन शोधण्यासाठी Googleने नुकतेच त्यांचे Find My Device हे फिचर आणले आहे.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana: ‘या’ महिलांना मिळणार ४,५०० रूपये! लाडकी बहीण योजनेतील बदललेला ‘हा’ नियम माहितीये का?
Find My Device काय आहे?
Find My Device हे एक अब्जाहून अधिक Android डिव्हाइसचे नेटवर्क आहे जे वापरकर्त्यांना त्यांचे हरवलेला Android स्मार्टफोन जलद आणि सुरक्षितपणे शोधण्यात मदत करण्यासाठी क्राउडसोर्स केले जाते. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना ऑफलाइन असताना देखील ॲपमधील मॅपवर त्यांच्या Android फोन आणि टॅबलेटचे ठिकाण दर्शवू शकते.
Find My Device हे वैशिष्ट्य कसे काम करते?
ऑफलाइन (इंटरनेटसह जोडलेले नसता तेव्हा) असताना तुमचे डिव्हाइस आणि फास्ट पेअर ॲक्सेसरीज शोधण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, Find My Device नेटवर्क मदत करते. Find My Device नेटवर्क तुमच्या Android डिव्हाइसने आणि इतरांनी पाठवलेली एन्क्रिप्ट केलेली स्थान माहिती वापरू शकते. जेव्हा तुमचे Android नेटवर्कमध्ये सामील होते, तेव्हा ते त्यांच्या मालकाला(Owner) शोधण्यासाठी जवळपासच्या डिव्हाइसची लोकेशनची माहिती सुरक्षितपणे पाठवते.
हेही वाचा – सतत मोबाइल वापरत आहात? तुम्हालाही होऊ शकतो ‘स्मार्टफोन पिंकी सिंड्रोम’! जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार?
तुम्हाला हे वैशिष्ट्य मनोरंजक वाटत असल्यास आणि तुमच्या Android स्मार्टफोनवर Find My Device कसे सक्रिय करायचे ते जाणून घ्या
Android स्मार्टफोनवर Find My Device कसे सक्षम करावे?
फोनच्या सेटिंग्जवर जा आणि “Security and Privacy” वर टॅप करा.
पुढे, “Device Finders” पर्यायावर टॅप करा.
त्यानंतर, “Find your offline devices” वर टॅप करा आणि पुढील पृष्ठावर नेव्हिगेट करा.
येथे, With Network in all areas” पर्याय निवडा.
© IE Online Media Services (P) Ltd