मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक नोंदणी विभागाकडे ‘फॉर्म ६’ द्वारे अर्ज करावा लागतो. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रेदेखील फॉर्मबरोबर जमा करावी लागतात. फॉर्म आणि ही कागदपत्रे निवडणूक नोंदणी विभाग किंवा निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागतात. यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत, ते म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाईन पर्यायामध्ये मतदार निवडणूक नोंदणी विभागाच्या वेबसाईटवर अर्ज करू शकतात, तर ऑफलाईन पर्यायामध्ये पोस्टाने अर्ज आणि कागदपत्रे निवडणूक नोंदणी विभागाला पाठवू शकतात. हे दोन्ही पर्याय वापरण्यासाठी कोणत्या पायऱ्या वापराव्या जाणून घ्या.

ऑनलाईन पद्धत
ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पुढील क्रम वापरा

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • रंगीत पासपोर्ट साईझ फोटो
  • घरच्या पत्त्याचा पुरावा अॅड्रेस प्रूफ) – यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक
  • वयाचा पुरावा – जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला वयाचा पुरावा म्हणून देऊ शकता. (जर तुमचे वय १८ ते २१ वर्षांमध्ये असेल तरच हा पुरावा मागितला जातो.)

या कागदपत्रांची ऑनलाईन कॉपी तयार ठेवा आणि निवडणूक नोंदणी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करा. त्यामध्ये दिलेला फॉर्म भरून त्याचप्रमाणे विचारण्यात आलेली कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर तुमची नावनोंदणी झाली आहे की नाही ते व्होटर हेल्पलाइन ॲप वर तपासू शकता.

Internet Hack : इंटरनेटद्वारे होऊ शकतो तुमचा फोन हॅक; हे टाळण्यासाठी नेहमी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

ऑफलाईन पद्धत
मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची ऑफलाईन पद्धतही सोपी आहे. यासाठी तुम्हाला ‘फॉर्म ६’ भरून पोस्टाने निवडणूक नोंदणी विभागाला पाठवू शकता. हा फॉर्म निवडणूक नोंदणी विभागाच्या कार्यालयामध्ये मोफत उपलब्ध होतो. किंवा तुम्ही ऑनलाईन हा फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता. हा फॉर्म आणि ऑनलाईन पद्धतीमध्ये सांगितलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही पोस्टाने निवडणूक नोंदणी विभागाला किंवा निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना पाठवू शकता. तुम्ही स्वतः निवडणूक नोंदणी विभागाच्या कार्यालयात जाऊनही हा फॉर्म आणि कागदपत्रं जमा करू शकता. अशाप्रकारे ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदवता येते. जर या प्रक्रियेबाबत काही शंका असेल तर तुम्ही 1950 या क्रमांकावर फोन करु शकता. (या नंबरपूर्वी तुमचा एसटीडी कोड वापरण्यास विसरू नका.)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to enroll in electoral roll know how to register in voter list offline and online method pns
Show comments