How To Find Empty Seat in Moving Train: आपल्याकडे लांबचा प्रवास हा प्रामुख्याने ट्रेनने केला जातो. बहुतांश लोक प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वेचा वापर करत असतात. अशा वेळी गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी रिझर्व्हेशन हा पर्याय वापरला जातो. पण कधी-कधी आरक्षित तिकीट मिळवण्यासाठीही खूप कसरत करावी लागते. अनेकदा वेळेवर रिझर्व्हेशन देखील मिळत नाही. अशा वेळी लोक वेटिंग तिकीट काढून जनरल डब्यातून प्रवास करत असतात. वेटिंगमध्ये तिकीट काढल्यावर रिझर्व्ह सीट मिळवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्सची मदत होते.

जर तुम्ही वेटिंग तिकीट काढून रेल्वेने प्रवास करत आहात आणि सीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, तर त्यासाठी तुम्हाला ट्रेनमध्ये कोणती सीट रिकामी आहे का हे तपासावे लागेल. यासाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटची मदत घेता येईल. वेबसाइटवर बर्थ स्टेटस पाहून तुम्ही ट्रेनमधील कोणत्या कोचमध्ये बर्थ खाली आहे का हे तपासू शकता. त्यासह तुम्ही त्या बर्थचा नंबर देखील मिळवू शकता. पुढे टीटीईकडे जाऊन तो सीट स्वत:च्या नावावर करुन त्या जागी जाऊन पुढील प्रवास आरामात करु शकता.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
central railway loksatta
प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…
Two arrested in Solapur for vandalizing ST bus
एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
Technical work Sindhi railway station, trains cancelled,
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ ९ रेल्वे रद्द…
ST Electric Bus, E Shivai Bus Pune, E Shivai Charging Stations pune, ST Electric Bus pune, pune,
आता ‘ई-शिवाई’ची प्रतिक्षा संपणार… कोणता अडथळा केला दूर ?

चालत्या ट्रेनमध्ये रिकामी सीट कशी शोधावी?

IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन होम पेजवर बुक तिकीट टॅब दिसेल. त्याच्यावर तुम्हाला पीएनआर स्टेटस आणि चार्ट/वेकंसी असा टॅब पाहायला मिळेल. या चार्ट/वेकंसी टॅबवर क्लिक केल्याने रिझर्व्हेशन चार्ट आणि जर्नी डिटेल टॅब स्क्रीनवर येतो. या टॅबमध्ये ट्रेनचा नंबर; ट्रेन कोणत्या स्थानकांवर थांबणार आहे; रेल्वेच्या प्रवासाची तारीख अशी माहिती दिलेली असते. याव्यतिरिक्त या टॅबमध्ये क्लास आणि कोच यांच्या आधारे बर्थ/सीट्सचे अपडेट्स देखील दिलेले असतात. तेथे जाऊन तुम्ही विशिष्ट कोचमध्ये सीट रिकामी आहे का हे शोधू शकता.

आणखी वाचा – Indian Railways : तुमच्या कन्फर्म रेल्वे तिकीटावर दुसऱ्या व्यक्तीला करता येणार प्रवास? जाणून घ्या रेल्वेची नवीन सुविधा

पूर्वी वेटिंग तिकीटावर प्रवास करणाऱ्या व्यक्तीला सीट मिळवण्यासाठी सतत टीटीईकडे जाऊन विनंती करावी लागत असे. शिवाय जर नशिबाने एखाद्या व्यक्तीला सीट खाली आहे हे समजले, तरी टीटीईकडून ते सीट रिझर्व्ह करेपर्यंत खूप वेळ लागत असे. काहीवेळेस सीट रिकामी आहे हे कळण्याआधीच स्टेशन येऊन लोक उतरत असत. प्रवाश्यांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने हा उपाय सुरु केला. https://www.irctc.co.in/online-charts/ या लिंकवर क्लिक करुन कोणीही चालू ट्रेनमधील रिकाम्या सीटबद्दल माहिती मिळवू शकतात.

Story img Loader