आंबा खाल्ल्याने एक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना इंदौरमध्ये घडल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. महिलेच्या शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आल्याचं बोललं जात आहे. आंब्यात विषारी द्रव्याचे अंश फॉरेन्सिक विभागातील अधिकाऱ्यांना सापडले असून यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे. परंतु, अनेकांना प्रश्न पडला आहे की, आंबा खाल्ल्याने खरंच कुणाचा मृत्यू होऊ शकतो का? खरंतर आंब्यांना पिकवण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
केमिकलचा वापर करून पिकवतात आंबे
आंब्यात फायबर, विटॅमिन सी, विटॅमिन ए आणि अन्य पोषक तत्व असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. आंब्याती मागणी वाढवण्यासाठी आणि ते दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी त्यांना गैर-प्राकृतिक पद्धतीने पिकवलं जातं. यासाठी विषारी केमिकलचा उपयोग केला जातो. ज्यामुळे अनेक साईड इफेक्ट्स होऊ शकतात. केमिकलने पिकवलेला आंबा विषारी होऊ शकतो. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)ने या केमिकलच्या साईड इफेक्टबद्दल माहिती दिलीय आणि ते तपासण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत.
नक्की वाचा – १९७२ पासून आजपर्यंत चंद्रावर कोणीच का जाऊ शकलं नाही? काय आहे यामागंच कारण, जाणून घ्या
विषारी मसाल्यांपासून पिकवतात आंबे
FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार, आंब्याला आर्टिफिशियल पद्धतीने पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा उपयोग केला जातो. कॅल्शियम कार्बाईडला ‘मसाला’ ही म्हटलं जातं. आंब्याशिवाय, हे केमिकल केळं, पपई आणि अन्य फळांना पिकवण्यासाठी वापरलं जांतं. यामुळे एसिटिलीन गॅसची निर्मिती होते आणि या गॅसमुळे आंबे पिकण्यात मदत होते. FSSAI ने आंबे पिकवताना वापरण्यात येणाऱ्या या खतरनाक केमिकल्स, कॅल्शियम कार्बाईडचे साईड इफेक्ट्सची माहिती सांगितली आहे.
१) उलटी
२) चिडचिडेपणा
३) खूप जास्त तहान लागणे
४) कमकुवतपणा
५) डोकं दुखणं
६) अन्न गिळताना अडथळा निर्माण होणे
७) त्वचेत अल्सर आणि अन्य समस्या
केमिकलने पिकवलेला आंबा कसा ओळखाल?
केमिकलने पिकवलेल्या आंब्याचा रंग, आकार आणि चव बदलते. आर्टिफिशियल पद्धतीने पिकवण्यात आलेले आंबे नैसर्गिक असल्यासारखे वाटतात. परंतु, यामध्ये पोषक तत्वांची कमी असते आणि साईड इफेक्ट्सलाही सामोरं जावं लागतं. FSSAI च्या माहितीनुसार, काळे डाग पडलेल्या आंब्यांना खाणे टाळावे. कारण यामध्ये कॅल्शियम कार्बाईडपासून निर्माण झालेली एसिटिलीन गॅस असू शकते. कोणतंही फळ खाताना ते पाण्यात चांगल्या प्रकारे धुवून घेतलं पाहिजे. ज्या आंब्याला काळे डाग असतात, ते केमिकलचा वापर करून पिकवले जातात.