How to know if mango is ripened with chemicals : भारतात सध्या आंब्याचा सीझन जोरात सुरू आहे. उन्हाळ्यात अनेकांना आवडणाऱ्या या फळाच्या अनेक प्रजाती सध्या बाजारात उपलब्ध झाल्या आहे. यात हापूस, लंगडा, तोतापुरी, पायरीसह अनेक आंबा प्रजातींना ग्राहक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. अनेक ग्राहक आंब्याच्या रंगाला आणि सुगंधाला भुलून आंबा खरेदी करतात. अनेकदा आंबे कृत्रिमरीत्या पिकवून ग्राहकांपर्यंत आणले जातात, पण ते नैसर्गिकरीत्या पिकवल्याचे सांगत विकले जातात. ज्यामुळे ग्राहकाचे आरोग्य धोक्यात येते. यामुळे आंबा खरेदी करताना ते नैसर्गिकरीत्या पिकवले आहेत की, कृत्रिमरीत्या हे ओळखता येणे गरजेचे आहे. कारण वर्षातून एकदा मिळणाऱ्या फळातून फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि असंख्य अँटिऑक्सिडंट्स यांसारखी अनेक पोषक तत्त्वे आपल्या मिळत असतात. त्यामुळे आंबा नैसर्गिकरीत्या पिकवला की कृत्रिमरीत्या हे कसे ओळखायचे हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.
नैसर्गिकरीत्या पिकलेली फळे निवडणे महत्त्वाचे असते. अनेकदा काही व्यावसायिक कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे नैसर्गिकरीत्या पिकवल्याचे सांगून ग्राहकांनी दिशाभूल करतात. पण असे आंबे खाणे ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)च्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे मानवी वापरासाठी सुरक्षित मानली जातात. मात्र ती सेफ रिपनिंग एजंट्स वापरून पिकवलेली असतात.
हेही वाचा – आंबा पाण्यात न भिजवता खाल्ल्यास होऊ शकते ‘हे’ नुकसान
आंबा पिकवण्यासाठी अनेकदा कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. पण FSSAI च्या प्रतिबंध आणि विक्री नियमन, २०११ कायद्यान्वये ‘कॅल्शिअम कार्बाइड’चा वापर करून कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यास बंदी आहे.
अन्न सुरक्षा एजन्सीने याबाबत इशार देत म्हटले की, आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कॅल्शियम कार्बाइड वापरताना त्यातून अॅसिटिलीन वायू बाहेर पडतो जो आंबा हाताळणाऱ्या व्यक्तीच्याआणि ग्राहकांच्या आरोग्याला हानिकारक असतो. याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत FSSAIने म्हटले की, कोणतेही फळ अशा प्रकारे पिकवणे आवश्यक आहे की, ज्यातून फळाचे पौष्टिक मूल्य वाढेल आणि ते ग्राहकांच्या आरोग्यासाठीही सुरक्षित असेल.
तुम्ही खरेदी केलेले आंबे खाण्यासाठी सुरक्षित आहे की नाही हे कसे ओळखाल?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर एखाद्याला आंब्याचा स्रोत म्हणजे ते कुठून आणले हे माहीत नसेल तर ते थोडे प्रेस करून किंवा वासावरून ओळखू शकता.
आंब्याचा आकार अंडाकृती असावा आणि सर्व आंबे एका साइजचे असावेत. तसेच नेहमी देठाजवळ गोल आणि नंतर खाली थोडा निमुळता असलेला आंबा निवडा. आंब्याचा वास घेतल्यावर आंबाचा गोडवा जाणवला पाहिजे. तसेच खोडाच्या रंगाप्रमाणे देठाचा रंग दिसत असेल तर तो आंबा चांगला पिकलेला असतो. असे आंबे नैसर्गिकरीत्या पिकवलेले असतात. रासायनिकरीत्या पिकवलेल्या आंब्यांच्या पृष्ठभागावर मध्येच पिवळ्या आणि हिरव्या रंगांचे काही पॅच असतात. या आंब्याचा रंग एकसमान नसतो. तसेच अशा प्रकारच्या आंब्यांचा देठ जाड आणि नीट पिकलेले नसते. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्यांवर पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे पॅच एकसमान दिसतात, अशी माहिती मुंबईतील रेजुआ एनर्जी सेंटरमधील निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. संतोष पांडे यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिली आहे.
आंबा नैसर्गिकरीत्या पिकलेला आहे की नाही कसे ओळखाल?
२) आंबे बादलीत नीट बुडले तर ते नैसर्गिकरीत्या पिकलेले असतात.
३) पण ते पाण्यावर तरंगत असतील तर ते कृत्रिमरीत्या पिकवलेले असतात असे समजा.
आंबे नैसर्गिक पद्धतीने की कृत्रिम पद्धतीने पिकवले हे ओळखण्याची ही लोकप्रिय घरगुती ट्रिक आहे. डॉ. पांडे यांच्या माहितीनुसार, कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यातून फार कमी रस निघतो आणि अनेकदा चवीला तो फार गोड नसतो. तर नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे खूप रसाळ आणि चवीला खूप गोड असतात.
हेही वाचा – आंबा गोड आहे की आंबट कसा ओळखायचा? फक्त ‘या’ ३ ट्रिक्स लक्षात ठेऊन आंबा खरेदी करा
आंबा अर्धा कापल्यानंतर तुम्हाला, कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याच्या सालीचा आतील रंग आणि बाहेरील रंग फार वेगळा असल्याचे आढळेल. परंतु नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्यामध्ये सालीचा रंग दोन्ही बाजूंनी समान असतो, असेही डॉ. पांडे म्हणाले.
योग्य आंबा कसा निवडायचा?
FSSAI नुसार :
१) नेहमी हानिकारक/प्रतिबंधित रसायनांचा वापर करून फळे पिकवत नसल्याचा दावा करणाऱ्या फळ विक्रेत्यांकडून/नामांकित स्टोअर्स/ विक्रेत्यांकडून आंबा विकत घ्या.
२) कोणतेही फळ खाण्यापूर्वी पिण्याच्या पाण्याने चांगले धुवा.
३) फळाच्या सालीवर जर डाग असतील तर ते खरेदी करु नका, कारण अनेकदा अशी फळे कॅल्शियम कार्बाइड टाकून पिकवलेली असू शकतात.