How to identify real hapus mango: एप्रिल, मे महिना सुरु झाला की, बाजारात फळांचा राजा आंब्याची मागणी वाढते. एप्रिल आणि मे हे दोन महिने आंब्याचा हंगाम असतो. आता बाजारात पिवळ्याधम्मक- आंब्यांनी ठाण मांडले आहे. महाराष्ट्रीय नागरिकांबरोबरच इतर राज्यातील लोकांनाही कोकणी हापूसचं विशेष आकर्षण असते. खवय्ये वाट्टेल त्या किंमतीत रत्नागिरी हापूस व देवगड हापूस घेण्यास तयार असतात. खवय्यांचा हाच विक पॉइंट लक्षात घेऊन काही विक्रेते कर्नाटकी आंबा मुंबईकरांच्या गळ्यात मारत आहेत. आंबा घेताना आपलीही अशी फसवणूक होऊ नये म्हणून नेहमी ४ सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुम्ही देवगड- रत्नागिरीचा हापूस आणि केरळी- कर्नाटकी हापूस यांच्यातला फरक लगेच ओळखू शकाल.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

अक्षयतृतीयेच्या दिवशी बाजारात आंब्याची मागणी वाढते. हाच मुहूर्त साधून बाजारात हापूस आंब्यांची आवकदेखील वाढते. सणासाठी तयार आंबा खायला मिळावा यासाठी घरगुती ग्राहकांसह विक्रेत्यांकडून मोठी मागणी असते.कर्नाटकी हापूसचा रंग, आकार रत्नागिरी हापूसशी मिळताजुळता असल्याने ग्राहकांची फसवणूक होते. अनेकदा विक्रेता कर्नाटकी हापूसचा भाव कमी करुन ग्राहकांना देतात. कर्नाटकी आंबा दिसायला हापूससारखा असला, तरी त्याला कोकणी हापूसची चव नसते. त्यामुळं घरी गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात येते. त्यामुळं रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकी हापूस या पद्धतीने ओळखा.

हापूस आंबा घेताना तो कधीही नुसता वरवर बघून खरेदी करू नका. कारण दिसायला कोकणातला हापूस आणि कर्नाटकी हापूस हे दोन्हीही सारखेच दिसतात. त्यामुळे नेहमी चव घेऊन, आंबा चिरूनच तो खरेदी करा.

कोकणातला हापूस आंबा हा आतून केशरी रंगाचा असतो. तर कर्नाटक- केरळचा हापूस हा पिवळसर रंगाचा असतो.कर्नाटकी हापूस हा आकाराने उभट असतो आणि त्याची साल जाड असते. देठाचा भाग हिरव्या रंगाचा असतो. टोकाकडे पिवळसर असतो.

कोकणातल्या हापूसची साल पातळ असते, तर कर्नाटकी हापूसची साल जाडसर असते.

कोकणातला हापूस हा अतिशय सुगंधी आणि गोड असतो. तर कर्नाटकी हापूसचा सुगंध अगदी कमी असतो. शिवाय तो सपक लागतो.

त्यामुळे आता आंबा खरेदी करताना वरील सगळ्या टीप्स लक्षात ठेवा आणि मगच आंबे खरेदी करा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to identify real hapus mango or real alphonso mango how to identify difference between real konkani hapus and karnataki hapus know the trick srk