सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) सध्या गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक सलग दुसऱ्या महिन्यात २५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिली, असे एएमएफआयच्या महिन्यानुसार एसआयपी योगदानाच्या आकडेवारीवरून दिसून आले. एसआयपी अनेक फायदे देतात; जे नवशिक्या आणि अनुभवी गुंतवणूकदारांना आकर्षित करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एसआयपीद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता आणि बाजारातील चढ-उतारांशी संबंधित जोखीम लक्षणीयरीत्या कमी करू शकता. त्याशिवाय तुम्ही ५०० रुपयांपासून एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. आज आपण एसआयपीचे पाच प्रमुख फायदे जाणून घेऊ…
एसआयपीसह जास्त परतावा (Higher returns with SIP)
अनेक पारंपरिक गुंतवणूक योजनांच्या तुलनेत एसआयपी चांगला परतावा देतात. तुम्ही कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि तुमचे उत्पन्न वाढल्यानंतर हळूहळू ती वाढवू शकता. याव्यतिरिक्त एसआयपी तुमच्या सोईनुसार गुंतवणूक सुरू ठेवण्याची लवचिकता प्रदान करतात.
लवचिक गुंतवणूक वेळापत्रक (Flexible investment schedule)
एसआयपी तुम्हाला मासिक, तिमाही किंवा सहामाही आधारावर गुंतवणूक करण्याची परवानगी देतात. आर्थिक संकट आल्यास तुमच्याकडे तुमची गुंतवणूक तात्पुरती थांबवण्याचा पर्यायदेखील आहे. ही लवचिकता एसआयपीला एक आकर्षक आणि सोईस्कर गुंतवणूक पर्याय बनवते.
चक्रवाढीची शक्ती (Power of compounding)
एसआयपीमध्ये चक्रवाढीची शक्ती वापरली जाते म्हणजेच तुम्हाला केवळ तुमच्या मूळ गुंतवणुकीवरच नव्हे, तर कालांतराने मिळणाऱ्या परताव्यावरही परतावा मिळतो. सरासरी १२ टक्क्यांपर्यंत परतावा – कधी कधी त्याहूनही जास्त – एसआयपी दीर्घकालीन भरीव संपत्ती उभारण्याची उत्कृष्ट संधी प्रदान करतात.
बचत आणि आर्थिक शिस्तीला प्रोत्साहन देते (Encourages savings and financial discipline)
एसआयपी नियमित बचत आणि आर्थिक शिस्तीची सवय लावतात. दरमहा तिमाही किंवा सहामाहीत गुंतवणुकीसाठी एक निश्चित रक्कम बाजूला ठेवून, तुम्ही तुमची आर्थिक बचत आणि खर्च यांचे नियोजन करण्यासाठी एक शिस्तबद्ध दृष्टिकोन विकसित करू शकता.
रुपयाच्या किमतीचा सरासरी फायदा (Rupee-cost averaging advantage)
एसआयपी ही योजना रुपयाच्या सरासरी खर्चाद्वारे बाजारातील जोखीम कमी करण्यास मदत करते. जेव्हा शेअर बाजार कोसळतो तेव्हा तुम्ही अधिक युनिट्स खरेदी करू शकता. जेव्हा शेअर बाजार तेजीत असतो तेव्हा कमी युनिट्स खरेदी होतात. ही रणनीती बाजारातील चढ-उतारांचा तुमच्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची खात्री करते. कालांतराने बाजार जसजसा सुधारतो, तसतसे तुमच्या सरासरी गुंतवणुकीला चांगले परतावे मिळतात.
दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी एसआयपी हे एक प्रभावी साधन असल्याचे सातत्याने सिद्ध झाले आहे. २०२५ मध्ये वन फायनान्सच्या म्युच्युअल फंडाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष रजनी तांदळे यांनी फायनान्शियल एक्स्प्रेसला माहिती देताना स्मार्टपणे एसआयपी सेट करण्याचे आणि त्यांची क्षमता वाढविण्याचे पाच व्यावहारिक मार्ग येथे सांगितले आहेत.
एसआयपी सेट करण्याचे पाच व्यावहारिक मार्ग (5 practical ways to set up SIPs) :
योग्य SIP रकमेपासून सुरुवात करा (Start with right SIP amount)
तुमची एसआयपी रक्कम निश्चित करण्यासाठी एक हटके दृष्टिकोन आवश्यक आहे. कोणत्याही तार्किक कारणाशिवाय आकडे निवडण्याऐवजी तुमचे उत्पन्न, खर्च व आर्थिक उद्दिष्टे यांचे सखोल विश्लेषण करा. रजनी तांडले सांगतात, “इतर योजनांपेक्षा एसआयपी चांगला परतावा देते. तुम्ही त्यात थोड्या रकमेपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि तुमचे उत्पन्न वाढत असताना ही रक्कम वाढवू शकता. एसआयपी तुम्हाला लवचिकता प्रदान करते, जेणेकरून तुम्ही तुमच्या सोईनुसार ते सुरू ठेवू शकता.
हेही वाचा –कुंभ आणि महाकुंभ मेळ्यामध्ये फरक काय? कुंभ मेळ्याचे किती प्रकार असतात?
दरवर्षी तुमचा एसआयपी वाढवा (Step up your SIP annually)
वाढत्या उत्पन्नासह तुमची SIP मधील गुंतवणूक ठरावीक रकमेने वाढवणे शहाणपणाचे आहे. स्टेप-अप एसआयपी निवडा, ज्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार वाढ होईल याची खात्री करून घ्या. त्यामुळे तुम्हाला स्वयंचलित वार्षिक वाढीची सुविधा मिळते.
तुमच्या वाढत्या उत्पन्नाचा मोठा भाग गुंतवण्यासाठी तुमचे उत्पन्न वाढत असताना दरवर्षी तुमच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP)ची रक्कम वाढवा.
डायरेक्ट एसआयपी निवडा (Choose direct SIPs)
कमिशनवर आधारित मध्यस्थाची मदत घेऊ नका. एसआयपीचे थेट पर्याय निवडा, जे चांगले परतावा देतात आणि कमी खर्चात करणे शक्य आहे. पक्षपाती सल्ला टाळण्याचा आणि खर्च नियंत्रणात ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
योजनांची संख्या मर्यादित करा (Limit number of schemes)
अति-विविधीकरणामुळे (Over-diversification) परतावा कमी होऊ शकतो आणि पोर्टफोलिओमध्ये ओव्हरलॅप निर्माण होऊ शकतो. सल्लागाराच्या मार्गदर्शनाने काही उच्च-गुणवत्तेच्या योजनांवर टिकून राहा. “SIP द्वारे,तुम्ही नियमित बचत आणि आर्थिक शिस्त शिकता. त्यामध्ये तुम्ही दरमहा, तिमाही किंवा सहामाही आधारावर गुंतवणुकीसाठी काही रक्कम बाजूला ठेवता; ज्यामुळे तुमच्या खर्चात शिस्त येते,” असे तांदळे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा –तुमच्या स्मार्ट वॉचमध्ये चमकणाऱ्या हिरव्या लाईटचं काम काय? थेट हृदयाशी आहे त्याचा संबंध?
वारंवार होणारी चलनवाढ टाळा आणि दीर्घकाळ गुंतवणूक करत राहा.
एसआयपी परतावा वाढवण्यासाठी संयम हा महत्त्वाचा घटक आहे. तांदळे यांनी भर दिल्याप्रमाणे, “एसआयपीमध्ये नियमितपणे गुंतवणूक केल्याने तुम्हाला रुपयाच्या सरासरी खर्चाचा फायदा मिळतो. जेव्हा बाजार पडतो तेव्हा तुम्हाला अधिक युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार वाढतो तेव्हा युनिट्सची संख्या कमी होते. मग बाजारात चढ-उतार असूनही तुमचे नुकसान होत नाही. जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या सरासरी गुंतवणुकीवर चांगले परतावे मिळण्याची संधी मिळते.”
योग्य रकमेपासून सुरुवात करून, दरवर्षी गुंतवणूक वाढवून आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन राखून, २०२५ हे वर्ष तुमची आर्थिक क्षमता वाढविण्याचे वर्ष ठरू शकते. एसआयपी हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही, तर ते दीर्घकालीन संपत्ती जमा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करते.