Ration Card Aadhaar Link Online Process : भारत सरकारने आधार कार्ड हा आपल्या सगळ्यांसाठीच सक्तीचं केलं आहे. नागरिक म्हणून आपल्या नागरिकत्वाचा तो महत्त्वाचा पुरावा आहे. आधार कार्ड दाखवल्याशिवाय दारिद्र्यरेषेखालील लोकांना रेशन कार्डवर मिळणारं धान्य, सोयी, सुविधा या देखील मिळत नाहीत. कारण बनावट रेशन कार्ड तयार करुन त्याद्वारे शिधा किंवा सुविधा घेण्याचे प्रकारही वाढल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यामुळेच सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे आधार कार्ड रेशन कार्डाशी लिंक करण्याचा. आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक कसं करायचं? हे आपण आता जाणून घेणार आहोत.
आधार आणि रेशन कार्ड कसं लिंक करायचं?
Public Distrubution System च्या वेबसाईटवर जा. त्यावर तुम्हाला लॉग इन करावं लागेल, तिथे आधार कार्ड रेशन कार्डाशी लिंक करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यावरुन तुम्हाला आधार कार्ड हे रेशन कार्डाशी लिंक करता येईल.
आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांचा नंबर तुम्हाला भरावा लागतो. त्यानंतर सगळे तपशील भरावे लागतील. आधार आणि रेशन कार्ड जोडण्यासाठी तुम्हाला ओटीपी येईल
ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर येईल, तो ओटीपी तुम्हाला पोस्ट करायचा आहे. ओटीपी आल्यानंतर तुमची ओळख नक्की केली जाईल. त्यानंतर तुमचं आधार आणि रेशन कार्ड जोडल्याचा मेसेज येईल. ज्यानंतर आधार आणि रेशन कार्ड जोडलं जाईल.
आधार लिंक करण्याआधी काय गोष्ट महत्त्वाची?
आधार आणि रेशन कार्ड एकमेकांशी लिंक करण्याआधी महत्त्वाचा मुद्दा हा असतो की तुमच्या आधार कार्डवर कुटुंबातील सगळ्या सदस्यांची नावं असली पाहिजेत.
तसंच रेशन कार्डवर ज्यांची नावं आहेत त्या सगळ्यांची आधार कार्ड एक एक करुन रेशन कार्डाशी लिंक करता येतात. त्यासाठी उपरोक्त टिप्सच फॉलो करायच्या आहेत. याशिवाय आधारवरचे तपशील चुकले आहेत असं वाटलं किंवा नाव चुकलं असेल, त्यात स्पेलिंगची चूक झाली असेल तर ते UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन विनामूल्य बदलता येतं. १४ डिसेंबर २०२४ पर्यंत ही सेवा मोफत होती. त्याची मुदत आता १४ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
आधार आणि रेशन कार्ड लिंक करणं हे फायद्याचं का ठरतं?
आधार आणि रेशन कार्ड लिंक केल्याने तुमचे सगळे तपशील लिंक होतात. शिवाय सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. तसंच तुमच्या नावावरचं किंवा बनावट ओळख तयार करुन शिधा कुणीही घेऊ शकत नाही. फ्रॉड किंवा फसवणूक होण्याची शक्यता जवळपास संपते त्यामुळे आधार आणि रेशन कार्ड जोडणं आवश्यक आहे.