खाजगी क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या करिअरच्या ग्रोथसाठी नोकरी बदलत राहतात. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. जर तुम्हीही नोकरी बदलली असेल किंवा ती बदलणार असाल तर नवीन कंपनी जॉईन केल्यानंतर एक काम अतिशय काळजीपूर्वक पूर्ण करा. पीएफ खाते विलीन करण्याचं हे काम आहे. नोकरी बदलल्यानंतर नवी पिएफ खाते उघडले जाते, मात्र ते उघडताना जुना यूएनएन क्रमांक वापरला जातो. जर तुम्हीही पीएफ खातेधारक असाल आणि तुमची दोन किंवा अधिक खाती असतील तर तुम्हीही पीएफ खाते विलीन करा. आता हे कसं करायचं तर हे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पूर्ण करु शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बऱ्याच वेळा जुन्या कंपन्यांमध्ये नोकरीदरम्यान जमा झालेला निधी नव्या पीएफ खात्यात जमा होत नाही. अशा परिस्थितीत जुन्या फंडाला नव्या खात्यात जोडण्यासाठी पीएफ खातेधारकाला ईपीएफओच्या वेबसाइटला भेट देऊन खाते विलीन करावे लागेल. यासाठी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये जाऊन स्टेप बाय स्टेप काही माहिती भरावी लागेल. चला तर जाणून घेऊयात काय आहे पीएफ खाते विलीन करण्याची संपूर्ण प्रक्रिया

ईपीएफ खाते कसे विलीन कराल –

  • ईपीएफओच्या वेबसाईटवर https://www.epfindindia.gov.in/site_en/ साइन इन करा
  • होमपेजवर जाऊन माय अकाऊंटवर क्लिक करा
  • माय अकाऊंटवरील खाते तपशील अंतर्ग मर्ज खाते निवडा
  • मर्ज अकाऊंट्स पेजवर, आपण आपल्या नवीन खात्यात विलीन करु इच्छित असलेल्या खात्यांचा तपशील प्रविष्ट करा.
  • संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईस नंबरवर व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी मिळेल.
  • तुमच्या रसिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, ओटीपी नंबर टाकताच तुमचे जुने पीएफ अकाऊंट दिसेल.
  • ही माहिती भरल्यानंतर सेव्ह करा आणि नंतर बंद करा.

UAN सक्रिय करणे आवश्यक –

यानंतर पीएफ खाते क्रमांक भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. खाते विलीन करण्याची तुमची विनंती स्वीकारली जाईल. त्यानंतर काही दिवसांच्या पडताळणीनंतर तुमचे खाते विलीन केले जाईल. तथापि, हे लक्षात ठेवा की ईपीएफशी संबंधित कोणत्याही सुविधेचा ऑनलाइन लाभ घेण्यासाठी, तुम्हाला तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) माहित असणे आवश्यक आहे. यासोबतच UAN अॅक्टिव्हेट करणे देखील आवश्यक आहे.

तुमचा UAN नंबर कसा ओळखाल –

तुम्हाला तुमचा UAN माहीत नसेल, तर तुम्ही तो ऑनलाइन शोधू शकता. यासाठी तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जावे लागेल. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या एम्प्लॉयी लिंक्ड सेक्शनवर क्लिक करा आणि ‘नो युअर यूएएन’ नंबरवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर Request OTP वर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. यावर तुम्हाला तुमचा पीएफ खाते क्रमांक आणि कॅप्चा भरावा लागेल. जन्मतारखेसोबत आधार किंवा पॅन क्रमांक टाकावा लागेल. यानंतर ‘Show My UAN Number’ वर क्लिक करा. तुम्हाला तुमचा UAN मिळेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to merge two or more epfo accounts srk
Show comments