How to Open PPF Account Online: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणूकदारांसाठी नियमितपणे कमी रक्कम गुंतवून करून त्यावर व्याज मिळवण्याचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये खातं उघडल्यानंतर काही वर्षांनी कर्ज घेण्याची आणि काही रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. पीपीएफ खातं कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येतं. पीपीएफवर ७.१ टक्के व्याजदर मिळतो. पीपीएफ खातं ऑनलाइनही सहज उघडता येतं, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रोसेस काय ते जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पीपीएफ खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखीचा पुरावा (मतदार आयडी/पॅन कार्ड/आधार कार्ड)
- रहिवासी पुरावा (मतदार आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड),
- पासपोर्ट साईज फोटो
- पे-इन-स्लिप (बँक शाखा/पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध)
- नॉमिनेशन फॉर्म (फॉर्म E8)
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या
काही महत्त्वाच्या गोष्टी
ऑनलाइन पीपीएफ खाते उघडण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. ज्या व्यक्तीचं खातं उघडायचं आहे, तिचं बँकेत बचत खातं असावं. नेट बँकिंग सुविधा अॅक्टव्हेट केलेली असावी. आधार क्रमांक तुमच्या बचत खात्याशी लिंक असावा. तसेच त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
पीपीएफ अकाउंट कसे उघडायचे?
- सर्वात आधी नेट बँकिंग पोर्टलच्या माध्यमातून बँक अकाउंट लॉग इन करा.
- होम पेजवर पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- तिथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. काही बँका हे ऑप्शन देत नाहीत. तुम्ही स्वतःचं खातं उघडताय की अल्पवयीन व्यक्तीचं त्याबबद्दल विचारलं जातं.
- तुम्ही त्यापैकी एका ऑप्शनवर क्लिक करू शकता.
- आवश्यक माहिती भरल्यावर नॉमिनी डिटेल्स, बँक डिटेल्स भरा.
- नंतर तुमच्यासमोर पर्मनंट बँक अकाउंट नंबर व इतर डिटेल्स येतील. त्याची पडताळणी करा.
- सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला पीपीएफमध्ये किती पैसे भरायचे आहेत ती संख्या टाका.
- तुम्हाला ही रक्कम हप्त्यात भरायची आहे की एकरकमी ते ऑप्शन दिले जाईल, त्यापैकी एक निवडा.
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल तो टाका व ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका.
- या स्टेप्स पूर्ण केल्यावर तुमचे पीपीएफ अकाउंट उघडेल. भविष्यातील वापरासाठी पीपीएफ नंबर लिहून घ्या.
पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाइन अन् ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खातं कसं उघडायचं?
- पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडण्याची प्रक्रिया ऑफलाइन आहे आणि त्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल.
- सर्वात आधी तुम्हाला जवळच्या इंडिया पोस्ट ऑफिस किंवा ऑनलाइन अर्जाचा फॉर्म घेऊन तो भरावा लागेल.
- पूर्ण भरलेला फॉर्म आवश्यक केवायसी कागदपत्रांच्या (आधार/पॅन/मतदार कार्ड), फोटोची सेल्फ अटेस्टेड कॉपीसह जवळच्या भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करावा लागेल.
- खातं उघडण्यासाठी तुम्हाला ड्राफ्ट/चेकच्या माध्यमातून किमान १०० रुपये किंवा तुम्हाला हवी तेवढी जमा करावी लागेल.
- तुमचं पोस्ट ऑफिस पीपीएफ खातं अॅक्टिव्हेट झाल्यानंतर, त्यासाठी पासबूक मिळतं. यात तुमचा पीपीएफ खाते क्रमांक, खात्यातील रक्कम आणि इतर महत्त्वाची माहिती लिहिलेली असते.
तुम्ही पीपीएफ खात्यात एका आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये आणि कमाल दीड लाख रुपये रुपये गुंतवू शकता. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीपूर्वी पीपीएफसाठी व्याजदर ठरवते. तुम्हाला काही अटी व शर्तींची पुर्तता केल्यावर पीपीएफवर कर्ज घेता येते.