केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलनांअतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात केली होती. त्या अंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, पालकांना उपयुक्त योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास मुलीचं शिक्षण आणि लग्नावेळी मुबलक पैसा उपलबद्ध होईल. सुकन्या समृद्धी योजनेत १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतो. त्यानंतर ६४ लाख रुपये मुलीच्या खात्यावर जमा होतात. यात सरकारकडून काही रक्कम देऊ केली जाते.
एका आर्थिक वर्षांत किमान गुंतवणूक रू. २५०/- व कमाल गुंतवणूक रू. १,५०,०००/- पर्यंत करता येते. मात्र दरवर्षी किमान पैसे न भरल्यास दंड आकारला जातो. पालकांना ८० सी कलमाअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर प्राप्तिकरांतून वजावट मिळते. योजनेतून व्याज लाभ करमुक्त आहे. साधारणपणे मुलांचे उत्पन्न वडिलांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर वडिलांना प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु या योजनेत गुंतवलेली रक्कम व व्याज वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्याखेरीज मुलीला मिळणार नाही.
खाते कुठे उघडता येते?
सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) खाते कोणत्याही अधिकृत पोस्ट ऑफिस शाखेत किंवा व्यावसायिक बँकांच्या अधिकृत शाखांमध्ये उघडता येते. सर्वसाधारणपणे , ज्या बँक सार्वजनिक भविष्य निधी (पीपीएफ) खाते उघडण्याची सुविधा देतात त्या सुकन्या समृद्धी योजनेसाठी (एसएसवाय) देखील पुरवते.
हा फॉर्म कुठे भरता येतो?
हा फॉर्म योजनेच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे, तो डाऊनलोड करून माहिती भरून तुम्ही जमा करू शकता. तसेच हा फॉर्म ऑफलाईन मार्गाने पोस्ट ऑफिस किंवा योजाना पुरवणाऱ्या बँक येथून मिळू शकेल.
कागदपत्रे कुठली?
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचे फॉर्म.
मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र (खाते लाभधारक).
ठेवीदाराची ओळख (पालक किंवा कायदेशीर पालक) म्हणजे , पॅन कार्ड , राशन कार्ड , वाहनचालक परवाना , पासपोर्ट.
ठेवीदाराचा पत्ता (पालक किंवा कायदेशीर पालक) , अर्थात पासपोर्ट , राशन कार्ड , वीज बिल , टेलिफोन बिल , वाहनचालक परवाना.
या खात्यात रक्कम कशी जमा करता येते?
या खात्यात तुम्ही रोख किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा चेकच्या स्वरुपात जमा करू शकता. चेक, डीडी, किंवा इतर मार्गाने रक्कम भरत असल्यास बँकेशी संपर्क साधून योग्य ती पद्धत वापरावी
पासबुक कसे मिळवावे?
एकदा खाते उघडले की , पोस्टऑफिस किवा बँक खाते उघडल्या नंतर तत्काळ पासबुक तुमच्या हातात देते.