आजकाल सर्व पेमेंट्स ऑनलाईन पद्धतीने केल्या जातात. वीजबिलही मोबाईल वरून सहजरित्या भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट या दोन्ही गोष्टींची गरज असते. पण आता या दोन्ही गोष्टींशिवायही वीजबिल भरता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने दिलेल्या माहितीनुसार ‘123 PAY’ चा वापर करून स्मार्टफोन आणि इंटरनेट शिवाय विजबिल भरता येणार आहे. ही सर्विस ७० इलेक्ट्रिसिटी बोर्डसबरोबर सुरू करण्यात आली आहे.
या नव्या सुविधेमुळे नागरिकांना थेट त्यांच्या बँक अकाउंटमधून वीजबिल भरता येणार आहे. एनपीसीआय वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, युपीआय पेमेंट करता येणाऱ्या सर्व फोन्सवर ‘123 PAY’ पेमेंट पद्धत वापरता येणार आहे. यासाठी ४ पर्याय उपलब्ध आहेत. आयवीआर ( इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) क्रमांकावर फोन करणे, ॲप फंक्शनॅलिटी, मिस्ड कॉल पर्याय व ‘प्रॉग्जीमिटी साउंड बेस्ट पेमेंट’ हे पर्याय उपलब्ध आहेत.
आणखी वाचा : नवे पॅनकार्ड बनवायचे आहे? ‘या’ स्टेप्स वापरून करा ऑनलाईन अप्लाय
‘युपीआय 123PAY’ चा वापर कसा करायचा जाणून घ्या
- सर्वात आधी युपीआय पेमेंटसाठी नोंदणी करावी लागेल. यासाठी पुढील स्टेप्स वापरा.
- आयवीआर नंबर – 080 4516 3666 / 6366 200 200 / 080 4516 3581 यावर कॉल करा.
- तुम्हाला हव्या असलेल्या भाषेचा क्रमांक निवडा.
- बँक खात्याची नोंदणी करण्याचा पर्याय निवडा.
- डेबिट कार्ड डिटेल भरा. त्यानंतर युपीआय पिन सेट करा. या स्टेप्स वापरून युपीआय पेमेंट करण्यासाठी नोंदणी करता येते.
आणखी वाचा : Internet Hack : इंटरनेटद्वारे होऊ शकतो तुमचा फोन हॅक; हे टाळण्यासाठी नेहमी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
- या सर्व प्रक्रियेनंतर 123PAY साठी 080 4516 3666 / 6366 200 200 / 080 4516 3581 यावर पुन्हा कॉल करा.
- वीजबिल भरण्यासाठी पर्याय उपलब्ध करणारा क्रमांक निवडा.
- कोणत्या इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये बिल भरायचे आहे ते सांगा.
- नंतर कॉलवर विचारण्यात येणारा कंज्यूमर किंवा कस्टमर नंबर सांगा.
- त्यानंतर वीजबिलाची रक्कम सांगितली जाईल. त्यानंतर डाइल पॅडवर युपीआय पिन डाइल करा. वीजबिलाची रक्कम ट्रान्सफर केली जाईल. अशाप्रकारे वीजबिल भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.