How To Pronounce Content: अलीकडे Content हा शब्द फार प्रचलित झाला आहे. तुम्ही लेखक असाल, व्हिडीओ बनवत असाल, तुम्ही पॉडकास्टसाठी आवाज देत असाल किंबहुना तुम्ही कोणत्याही माध्यमातून माहिती देत असाल तर तुम्ही Content तयार करत आहात असे म्हंटले जाते. अगदी इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर पासून ते प्रसिद्ध पत्रकार, लेखकांपर्यंत प्रत्येक जण Content क्रिएटर असतो. पण याचा योग्य उच्चार करताना भलेभले मातब्बरही चुकतात. आज आपण अगदी साध्या शब्दात या शब्दाचे दोन उच्चार त्या दोघांचे वेगळे योग्य अर्थ व फरक जाणून घेणार आहोत.
तर मंडळी काहीजण Content चा उच्चार कंटेंट असा करतात, बरोबर? हा शब्द योग्य आहे पण याचा अर्थ होतो समाधानी. जेव्हा आपल्या समृद्ध वाटतं तेव्हा आपण हा शब्द कंटेंट असा उच्चारणे योग्य असते. कंटेट ही एक समृद्ध भावना आहे.
आता दुसरा उच्चार तो म्हणजे कॉन्टेन्ट. हा शब्द सामग्रीशी संबंधित आहे. म्हणजेच तुम्ही एखादी माहिती जेव्हा लिखित किंवा ऑडिओ- व्हिडीओ स्वरूपात सादर करता तेव्हा तुम्ही कॉन्टेन्ट प्रसारित करत असता. एखाद्या पुस्तकात काय सामावलं आहे हे तुम्हाला कॉन्टेन्टच्या तक्त्यावरून समजते तर ते पुस्तक वाचून तुम्हाला समाधान जाणवले तर तुम्हाला कंटेंट वाटते. हा इतका साधा व सोपा फरक या दोन्ही शब्दांच्या उच्चारात आहे.
हे ही वाचा << मराठी भाषेत शुद्ध बोलायचंय? जीभ वळवण्यासाठी ‘ही’ ९ वाक्य नेहमी म्हणून पाहा
कन्टेन्ट की कॉन्टेन्ट?
हे ही वाचा << वॉशरूमला जाण्यासाठी करंगळीच का दाखवली जाते? शास्त्रात सांगितलं आहे ‘हे’ कारण
जर तुम्ही स्वतःला कॉन्टेन्ट क्रिएटर म्हणून सादर करत असाल तर, उच्चार योग्य असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा यासाठी सर्वात सोपा मराठी पर्याय लेखक निवेदक किंवा सर्व समावेशक कलाकार हे ही शब्द आपण वेळेनुसार वापरू शकता.