आधार कार्ड हे भारतीयांसाठी महत्त्वाचं ओळखपत्र आहे. आजकाल आधार कार्डचा वापर आता प्रत्येक गोष्टींसाठी केला आहे. त्यामुळे काही ठिकाणी आधार नंबर द्यावा लागतो तर काही ठिकाणी आधारची फोटो कॉपी द्यावी लागते. अशावेळी अनेकदा आधार कार्डचा गैरवापर होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे आधार कार्डचा गैरवापर झाला आहे की नाही? जर झाला असेल तर तक्रार कशी करायची? आणि जर आधारचा गैरवापर झाला नसेल तर त्याआधी काय करायचं? हे सर्वकाही जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधार कार्डचा गैरवापर ऑनलाइन कसा तपासायचा?

  • सर्वात आधी my Aadhar या वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर लॉगिंन करण्यासाठी आधार कार्डनंबर आणि कॅप्चा कोड टाका. मग लॉगिंन विथ ओटीटीवर क्लिक करा.
  • आधारकार्डशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर ओटीटी येईल तो टाकून लॉगिंन करा.
  • मग Authentication History या हा सहावा पर्याय सिलेक्ट करा आणि तुमच्या आधार वापराचे पुनरावलोकन करण्यासाठी तारीख निवडला. त्यानंतर UIDAI वेबसाईटवर कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार करा.

तुमचे आधार कार्ड बायोमेट्रिक्स ऑनलाइन कसे लॉक करावे?

  • my Aadhar या वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर ‘आधार लॉक/अनलॉक करा’ यावर क्लिक करा. गाइडलाइन्स वाचा आणि मग पुढे जा.
  • तुमची माहिती भरा. यामध्ये तुमचा व्हर्च्युअल आयडी, पूर्ण नाव, पिनकोड आणि कॅप्चा लिहावा लागले. मग ‘सेंड ओटीपी’वर क्लिक करा.
  • मोबाइलवर आलेला ओटीपी टाका. त्यानंतर समिटीवर क्लिक करून आधार कार्ड लॉक करा.

आधारकार्डच्या गैरवापराची ऑनलाइन तक्रार कशी करावी?

तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचा संशय असल्यास १९४७ या नंबरवर कॉल करून, help@uidai.gov.in या ई-मेल आयडीवर मेल करून किंवा UIDAI वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकता.

आधार कार्डच्या फोटोकॉपीचा गैरवापर टाळा

तुम्ही आधार कार्डच्या घेतलेल्या फोटोकॉपीवर तुमची सही, तारीख आणि नेमका उद्देश लिहिला.

मास्क्ड आधार कार्डचा वापर करा. इथे आधार कार्डचे पहिले आठ अंक लपवलेले असतात. या my Aadhar या वेबसाईटवर जा. त्यानंतर डाउनलोड आधार कार्डवर क्लिक करा. तिथे तुम्हाला वरती मास्क्ड आधार पाहिजे का? असं विचारलं जातं, त्यावर क्लिक करा. मग डाउनलोड करा. नंतर तुम्हाला मास्क्ड आधार कार्ड मिळेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to protect and lock your aadhaar card pps