PVC Aadhaar Card : आजकाल सर्वत्र आधार कार्डाची गरज भासते. अगदी शाळा, कॉलेजच्या प्रवेशापासून ते सरकारी योजनांच्या लाभासाठी आधी आधार कार्ड मागितले जाते. पण, पूर्वी आधार कार्ड अगदी साध्या पेपर टाईपमध्ये यायचे, जे सहज फाटण्याची किंवा खराब होण्याची भीती होती. त्यामुळे नव्याने आधार कार्ड काढावे लागायचे. पण आता पीव्हीएस आधार कार्ड हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे. पीव्हीएस आधार कार्ड लवकर खराब होत नाहीत, तसेच ते घरबसल्या तुम्ही ऑनलाइनदेखील काढू शकता. पण पीव्हीएस आधार कार्ड म्हणजे काय, त्याचे फायदे आणि त्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय?

पीव्हीसी हे एक प्लास्टिक कार्ड आहे. हे कार्ड लवकर खराब होत नाही. त्यात क्यूआर कोड, मायक्रो-टेक्स्ट, होलोग्राम व घोस्ट इमेज सिक्युरिटी आहे.

पीव्हीसी आधार कार्ड कसे बनवायचे?

१) UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in वर जा.

२) त्यानंतर My Aadhaar सेक्शनवर टॅप करा, जिथे तुम्ही Order Aadhaar PVC Card ऑप्शनवर टॅप करा.

३) त्यानंतर आधार क्रमांक व कॅप्चा टाका आणि सेंड ओटीपी ऑप्शनवर टॅप करा.

४) आता तुम्हाला OTP टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल, जो पडताळून घ्यावा लागेल.

५) त्यानंतर आधार कार्डाची डिजिटल प्रत दिसेल. मग तपशिलांची पडताळणी करावी लागेल.

६) आता तुम्हाला प्लेस ऑर्डर बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ५० रुपये शुल्क स्वरूपात भरावे लागतील.

७) त्याचे पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे करू शकता.

८) शेवटी पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या घरी जलद गतीने पाठविण्यात येईल. हे कार्ड १५ दिवसांत स्पीड पोस्टद्वारे तुमच्या घरी पोहोचेल.

ई-आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे?

ई-आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल नंबरद्वारे पडताळणी करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP पाठविला जाईल. आधार युजर्सना UIDAI च्या MyAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar/hi वर जावे लागेल. त्यानंतर तुम्ही mAadhaar अॅप वापरून ई-आधार डाऊनलोड करू शकता.

पीव्हीसी आधार कार्डाचे फायदे

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पीव्हीसी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. ते डेबिट आणि क्रेडिट कार्डप्रमाणे सहजपणे पॉकेटमध्ये ठेवता येते. ते बनविण्याचा खर्च फक्त ५० रुपये आहे आणि त्याची ऑनलाइन प्रक्रियाही खूप सोपी आहे.