How to Read WhatsApp Messages Privately : व्हॉट्सअप हे भारतासह जगभरात वापरले जाणारे संवादाचे एक लोकप्रिय माध्यम आहे. व्हॉट्सअप हे मित्र आणि कुटूंबाशी जुळून राहण्यासाठी, तसेच काही लोकांसाठी व्यावसायिक दृष्टीने संवाद साधण्याचा पर्याय म्हणूनही काम करते. अनेक लोक तुमच्याशी व्हॉट्सअपवर संवाद साधतात. तुम्हाला मेसेज, कॉल, व्हिडीओ कॉल करतात. काही वेळा आपण समोरच्याचा मेसेज वाचतो; पण लगेच रिप्लाय देण्याचा आपला मूड नसतो किंवा आपण मेसेज वाचला हे इतरांना कळू नये, असे आपल्याला वाटते. त्यासाठी तुमच्या व्हॉट्सअपच्या प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये थोडे बदल करणे आवश्यक असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सअपवर जेव्हा एखाद्या युजरने मेसेज वाचला तेव्हा पाठविणाऱ्याला मेसेजवर ब्ल्यू टिक दिसते. हे काही प्रकरणात फायदेशीर ठरते; पण जेव्हा युजरला तो मेसेज पाठवणाऱ्याला कळू न देता वाचायचा असेल तेव्हा मात्र त्याला ती ब्ल्यू टिक नकोशी वाटते. पण युजर्स ही ब्ल्यू टिक बंद करू शकतात आणि समोरच्या कळू न देता मेसेज वाचू शकतात. त्यासाठी प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये कोणते बदल करावे, याविषयी जाणून घेऊ… (How to Read WhatsApp messages secretly without Letting the sender know)

व्हॉट्सअप मेसेजवरील ब्ल्यू टिक कशी बंद करावी? (A Step-by-Step Guide)

सुरुवातीला व्हॉट्सअप उघडा आणि सेंटिग्जमध्ये जा.
त्यानंतर प्रायव्हसी ऑप्शन निवडा आणि Read Receipts नावाचा पर्याय दिसेल.
चॅटवरीव ब्ल्यू टिक बंद करायची असेल, तर Read Receipts पर्याय ऑफ करा.
मग व्हॉट्सअप मेसेजवरील ब्ल्यू टिक बंद होईल.
जेव्हा तुम्हाला ब्ल्यू टिक पुन्हा सुरू करायची असेल तेव्हा Read Receipts पर्याय ऑन करा.

पण, हे लक्षात घ्या की, जेव्हा तुम्ही ब्ल्यू टिक बंद करता तेव्हा तुम्ही इतरांना केलेल्या मेसेजवरील ब्ल्यू टिकसुद्धा बघू शकत नाही. हे फीचर ग्रुप चॅटवर लागू होत नाही. जेव्हा ग्रुपमधील सर्व सदस्यांनी तुमचा मेसेज वाचला असेल, तेव्हा दोन ब्ल्यू टिक दिसून येतात.

त्याशिवाय तुम्ही व्हॉट्सअपवरील तुमचा लास्ट सीन म्हणजेच तुम्ही ऑनलाइन आहात की नाही किंवा कधी ऑनलाइन होता, हे लपवू शकता. जाणून घेऊ या कसे?

WhatsApp वर ‘Last Seen’ कसा लपवावा? (A Step-by-Step Guide)

सेटिंग्जमध्ये जा आणि प्रायव्हसी पर्याय निवडा.
त्यानंतर ‘लास्ट सीन आणि ऑनलाइन’ पर्यायावर जा.
त्यात आणखी चार पर्याय दिसतील – everyone (प्रत्येक जण), My contacts (माझ्या संपर्कातील लोक), My Contacts Except (माझ्या संपर्कात नसलेले लोक) किंवा Nobody (कोणीही नाही).

जर तुम्हाला तुमच्या ऑनलाइन स्टेटसबाबत माहिती लपवायची असेल, तर तुम्ही Nobody (कोणीही नाही) हा पर्याय निवडा. त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअपच्या अॅक्टिव्हिटीवर नियंत्रण ठेवून, प्रायव्हसी जपत संवाद साधता येतो.