Recover Deleted Files: विंडोजवर काम करताना अनेकदा घाई गडबडीत आपल्याकडून एखादी महत्त्वाची फाइल डिलीट होते. नंतर फाइल पु्न्हा कशी मिळवावी हा मोठा प्रश्न पडतो. खूप प्रयत्न करूनही काहीही फायदा होत नाही. पण, आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही डिलीट केलेली फाइल परत मिळवू शकता.

१. डिलीट केलेली फाइल लगेच मिळवा (Undo Delete)

फाइल लगेच परत मिळण्यासाठी Ctrl+Z दाबा. फोल्डर बंद करण्यापूर्वी किंवा संगणक पुन्हा सुरू करण्यापूर्वीच Ctrl+Z दाबा. तुम्हाला डिलीट केलेली फाइल परत मिळू शकते.

२. रिसायकल बिन तपासा (Check the Recycle Bin)

जर तुम्ही चुकून एखादी फाइल डिलीट केली असेल तर तुम्हाला ती रिसायकल बिन या पर्यायामध्ये दिसू शकते, त्यामुळे फाइल डिलीट झाल्यानंतर लगेच रिसायकल बिन तपासा.

३. फाइल हिस्ट्री (File History)

जर फाइल हिस्ट्रीचा पर्याय सुरू असेल तर तुम्ही फाइल जिथे होती त्या फोल्डरमध्ये जाऊ शकता आणि डिलीट केलेली फाइल परत मिळवू शकता.

४. विंडोज फाइल रिकव्हरी (Windows File Recovery)

जर तुम्हाला तुमच्या बॅकअपमधून हरवलेली फाइल सापडत नसेल तर तुम्ही ‘विंडोज फाइल रिकव्हरी’ अॅप वापरू शकता, जे मायक्रोसॉफ्ट स्टोअरद्वारे उपलब्ध करून दिलेले कमांड लाइन अॅप आहे.

५. थर्ड-पार्टी अ‍ॅप्स (Third Party Apps)

जर वरील सर्व प्रकारे प्रयत्न केले, पण काहीही फायदा झाला नाही तर तर तुम्ही डिलीट केलेली फाइल पुन्हा मिळवण्यासाठी थर्ड-पार्टी टूल्स वापरू शकता. अनेकदा थर्ट पार्टी अॅप्स फायदेशीर ठरतात.

६. बॅकअपमधून रिस्टोअर करा (Restore from backup)

जर तुम्ही नियमितपणे तुमचा डेटा बॅकअप घेत असाल, तर तुम्ही बॅकअप ड्राइव्हशी कनेक्ट करत क्लाउड स्टोरेजचा अॅक्सेस घेऊन फाइल परत मिळवू शकता.

जर माहिती खूप महत्त्वाची असेल, वरीलपैकी कोणतेही पाऊल काम करत नसेल, तर संबंधित व्यावसायिकांची मदत घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने डिलीट झालेली माहिती किंवा फाइल परत मिळवा.