How to Register Marriage Online: आपल्या देशात लग्नाला खूप महत्त्व आहे. काही लोक पारंपरिक पद्धतीने लग्न करतात तर काही नोंदणी पद्धतीने करतात. पारंपरिक लग्न झाल्यानंतर त्याची कायदेशीर नोंद करणंही खूप महत्त्वाचं असतं. लग्नानंतर विवाहित जोडप्याने विशेष विवाह कायदा, १९५४ (Special Marriage Act) आणि हिंदू विवाह कायदा, १९५५ (Hindu Marriage Act) अंतर्गत त्यांच्या लग्नाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. लग्नाच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रं, ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया आणि विवाह प्रमाणपत्राचे फायदे याबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नाची नोंदणी करण्यासाठी पात्रता

  • महाराष्ट्रात विवाह प्रमाणपत्र ऑनलाइन मिळवण्यासाठी वधू व वर यांना खालील पात्रता अटी पूर्ण कराव्या लागतात.
  • महाराष्ट्रात विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वर किंवा वधू भारताचा कायमस्वरुपी रहिवासी असावा.
  • वराचे वय २१ वर्षे आणि वधूचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे.

पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाइन अन् ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

लग्नाची नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं

  • अर्जाचा फॉर्म
  • लग्नाची तारीख, लग्नाचे ठिकाण, वैवाहिक स्थिती आणि राष्ट्रीयत्व हे तपशील असलेले वर व वधूचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.
  • पासपोर्ट-साईझ फोटो
  • लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो
  • लग्नातील वधू वराचा फोटो
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • वराचा जन्म दाखला (वयाचा पुरावा)
  • वधूचा जन्माचा दाखला (वयाचा पुरावा)
  • धार्मिक स्थळी विवाह झाला तर त्याचा पुरावा
  • दोन साक्षीदारांची माहिती
  • लग्न परदेशात केलं असेल तर दूतावासाकडून ना हरकत प्रमाणपत्र
  • अर्जदार विधुर/विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्राची प्रत आणि घटस्फोटित असेल तर घटस्फोटाची व्हेरिफाइड कॉपी ही कागदपत्रं आवश्यक आहेत.

भारतात पहिला कॉल कोणी कोणाला केला होता? एक मिनिट बोलण्यासाठी यायचा ‘इतका’ खर्च

लग्नाची नोंदणी ऑनलाइन कशी करावी?

  • लग्नाच्या नोंदणीसाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला लग्नाची नोंदणी करण्यासाठी Apply Now या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • इथे क्लिक केल्यावर तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये जी माहिती विचारण्यात आली असेल ती तुम्हाला अचूक भरावी
  • लागेल. यात तुम्हाला तुमचे नाव, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती मागितली जाते.
  • ही सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करावी लागतील.
  • ही माहिती भरल्यावर तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल. अशारितीने तुम्ही विवाह नोंदणी करू शकाल.

लग्नाची नोंदणी ऑफलाइन कशी करावी?

  • ऑफलाइन मोडमध्ये, तुम्हाला सब रजिस्ट्रारच्या कार्यालयात जावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तेथून विवाह नोंदणी फॉर्म घ्यावा लागेल.
  • तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर भरावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. आता तुम्हाला हा फॉर्म सब रजिस्ट्रारच्या कार्यालयात जमा करावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जाईल, त्यावर तुम्ही नोंदणीची प्रक्रिया कुठेपर्यंत पोहोचली हे तपासू शकता. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला विवाह प्रमाणपत्र मिळतं.

पुण्यात इतक्या पेठा असूनही ‘नवी पेठ’ची निर्मिती का करण्यात आली?

विवाह प्रमाणपत्राचे फायदे

  • विवाह प्रमाणपत्रावरून तुमचं लग्न झालंय हे सिद्ध होतं, त्यामुळे हे कागदपत्र अधिकृत रेकॉर्ड म्हणून वापरता येते.
  • यात वयाचा उल्लेख असल्याने कायदेशीर लग्नाच्या वयाचे नियम पाळले जातात.
  • बालविवाह रोखण्यास मदत होते.
  • हे प्रमाणपत्र असेल तर विधवांना कायदेशीररित्या वारसा हक्क मागता येतो.
  • हे द्विपत्नीत्व किंवा बहुपत्नीत्व रोखण्यासाठी वापरले जाऊ शकते.
  • हे प्रमाणपत्र महिलांना मुलांच्या कस्टडीसाठी मदत करते.
  • तसेच इमिग्रेशन फायदे मिळविण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसासाठीही विवाह प्रमाणपत्र वापरले जाते.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to register marriage online what documents required for wedding certificate hrc