स्टेट बँक ऑफ इंडियाने योनो (यु ओन्ली नीड वन) या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म लॉन्च करून युजर्ससाठी बँकेचे व्यवहार करणे अधिक सोपे केले. वेबसाईट आणि ॲप अशा दोन्ही ठिकाणांवरून ‘योनो’चा वापर करता येतो. मेडिकल बिल भरणे, नेट बँकिंग, फिक्स डिपॉझिट खाते उघडणे, बँक व्यवहारांची नोंद ठेवणे, ऑनलाईन शॉपिंग यासह बस, ट्रेन, टॅक्सी, विमान यांचे तिकीट बूक करण्यासाठी या प्लॅटफॉर्मची मदत होते. तुमच्या अँड्रॉइड किंवा आयओएस फोनमध्ये हे ॲप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणारे सर्वजण योनो प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात. यासाठी अकाउंट डिटेल्स भरून स्वतःचा पासवर्ड आणि युजरनेम सेट करावा लागेल. हा युजरनेम आणि पासवर्डची लॉग इन करताना प्रत्येकवेळी विचारण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने एसबीआयकडुन ही प्रक्रिया मोठी ठेवण्यात आली आहे. काहीवेळा युजर्स त्यांचा पासवर्ड आणि युजरनेम विसरतात ज्यामुळे त्यांना योनो अकाउंटमध्ये लॉगिन करता येत नाही. अशावेळी काही सोप्या स्टेप्स वापरून ते युजरनेम आणि पासवर्ड बदलू शकतात. कोणत्या आहेत त्या स्टेप्स जाणून घ्या.

आणखी वाचा : आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग

योनो अकाउंटचे पासवर्ड आणि युजरनेम बदलण्याच्या स्टेप्स

  • onlinesbi.com ही एसबीआयची अधिकृत वेबसाईट उघडा.
  • तिथे तुम्हाला अकाउंट डिटेल्स भरण्याचा पर्याय दिसेल त्याऐवजी ‘फॉरगॉट युजरनेम/लॉगइन पासवर्ड’ पर्याय निवडा.
  • एक पॉप अप विंडो उघडेल त्यामध्ये ‘फॉरगॉट माय युजरनेम’ पर्याय निवडून नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा.
  • सीआयएफ नंबर, देश, इंटरनेट बँकिंग, मोबाईल नंबर ही माहिती भरा.
  • सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे नवीन योनो युजरनेम स्क्रिनवर दिसेल आणि याचा रजिस्टर मोबाईल नंबर वर मेसेज देखील येईल. या स्टेप्स वापरून तुम्ही युनो अकाउंट चे नवीन युजरनेम आणि पासवर्ड सेट करू शकता.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to reset sbi yono username and password online use these steps pns