How To Restore WhatsApp Chat History : व्हॉट्सॲप हा प्रत्येकाचा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सॲप असेलच. व्हॉट्सॲप हे फक्त मेसेज पाठवण्यासाठी नाही तर व्हिडीओ किंवा ऑडिओद्वारे संवाद साधण्यासाठी, महत्त्वाचे कागदपत्र, फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासाठी वापरले जाते.
तुमच्याबरोबर कधी असे घडले का, तुम्ही कळत-नकळत किंवा चुकून एखादी चॅट डिलीट केली किंवा नवीन फोन खरेदी केला आणि त्यात व्हॉट्सॲप उघडले, पण जुन्या सर्व चॅट डिलीट झाल्या आहेत. अशावेळी काय करावे, हे कुणालाच सुचत नाही. पण टेन्शन घेऊ नका, आज आपण डिलीट झालेले चॅट पुन्हा रिस्टोअर कसे करावेत, याविषयी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॉट्सॲप चॅट्स रिस्टोअर करणे हे तुम्ही Android किंवा iOS डिव्हाइस वापरत आहात की नाही आणि तुम्ही लोकल लेव्हलचा वापर करत आहात की क्लाउडसंबंधित स्टोरेज सेवांचा लाभ घेत आहात यावर अवलंबून असते.

Android फोनमध्ये व्हॉट्सॲप चॅट रिस्टोअर दोन पद्धतीने करू शकता.

१. गूगल ड्राइव्ह बॅकअप वापरणे:

गूगल ड्राइव्हमध्ये जा आणि व्हॉट्सॲप बॅकअपचा पर्याय आहे का ते तपासा.
मेन्यूवर “बॅकअप” सर्च करा आणि ऑन करा
व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा इनस्टॉल करा.
सेटअपदरम्यान, WhatsApp तुम्हाला तुमच्या Google ड्राइव्हवरून चॅट रिस्टोअर करण्यास परवानगी देईल, त्यासाठी रिस्टोअरवर क्लिक करा.

२. लोकल बॅकअप वापरा

तुमच्या फोनमधील फाइल ब्राउझर किंवा फाइल मॅनेजमेंट ॲप वापरा.
व्हॉट्सॲप > डेटाबेस सर्च करा
जर तुम्ही नवीन फोन खरेदी केला असेल तर व्हॉट्सॲप रिस्टोअर करण्यासाठी नवीन बॅकअप नवीन फोनच्या व्हॉट्सॲप > डेटाबेस फोल्डरमध्ये ट्रान्सफर करा. बॅकअप फाइलचे नाव ‘msgstore-YYYY-MM-DD.db.crypt12’ असे असावे.
व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा इन्स्टॉल करा: हे गूगल ड्राइव्ह सिस्टीमसारखेच आहे.
व्हॉट्सॲप इन्स्टॉल करताना तुम्हाला रिस्टोअर पर्याय येईल, त्यावर क्लिक करा.

आयफोनवरील व्हॉट्सॲप चॅट कसे रिस्टोअर करावे?

iCloud सेटिंग्ज उघडा आणि व्हॉट्सॲप बॅकअप ऑन आहे का नाही हे तपासा.
व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल आणि पुन्हा रिइन्स्टॉल केल्याने रिस्टोर पर्याय दिसेल.
सेटअपदरम्यान, iCloud वरून तुमची चॅट रिस्टोअर करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे अनुकरण करा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to restore whatsapp chat history if your whatsapp chat was deleted check simple tricks ndj