‘क्विक रिस्पॉन्स कोड’ म्हणजेच ‘क्यू आर कोड’चा वापर करून आपण सहजरित्या डिजिटल पेमेंट करतो. ‘क्यू आर कोड’मध्ये युआरएल किंवा इतर माहिती साठवली जाते. स्मार्टफोन मधील कॅमेराद्वारे कोणताही ‘क्यू आर कोड’ स्कॅन करून आपण त्यातील युआरएलच्या मदतीने वेबसाइट्सवर पोहोचतो. ज्यावर डिजिटल पेमेंट आयडी, सोशल मीडिया प्रोफाइल अशा गोष्टींचा समावेश असतो. पण क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला ॲपचा वापर करावा लागतो. पण तुम्हाला माहित आहे का कोणत्याही अ‍ॅपशिवाय क्युआर कोड स्कॅन करता येणे शक्य आहे. कसे ते जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅपशिवाय क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा

  • फोनमधील कॅमेरा सुरू करा.
  • त्यामध्ये समोरचा स्कॅनर व्यवस्थित दिसेल याची काळजी घ्या.
  • कोड स्कॅन झाल्यानंतर स्क्रीनच्या तळाशी एक युआरएल येईल.
  • त्यांनंतर त्या लिंक वर क्लिक करुन तुम्ही युआरएलच्या मदतीने हव्या त्या पेजवर जाऊ शकता.

आणखी वाचा : व्हॉटसअ‍ॅपवरील Video Call रेकॉर्ड करायचाय? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स

गूगल लेन्सच्या मदतीने क्यू आर कोड स्कॅन करण्याच्या स्टेप्स

  • गूगलमधील कॅमेरा अ‍ॅप उघडा.
  • स्कॅन करण्यासाठी पर्याय निवडा (टेक्स्ट, सर्च, होमवर्क, शॉपिंग, प्लेसेस, डायनिंग यामधील पर्याय निवडा)
  • गूगलच्या मदतीने क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी ‘क्यू आर’ पर्याय निवडा.
  • कॅमेरामध्ये ‘क्यू आर कोड’ नीट दिसेल याची काळजी घ्या.
  • याद्वारे तुम्हाला हवे ती वेबसाईट युआरएलच्या मदतीने उघडली जाईल.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to scan a qr code without an app use this simple method pns