How To Schedule Email In Gmail : नोकरीसाठी अर्ज करणे, ऑफिसमधील कामे, एखाद्या दुकानदारला ईमेलद्वारे फोटो पाठवून झेरॉक्स काढणे, जास्त एमबी असलेले फोटो इतरांना शेअर करणे आदी अनेक गोष्टींसाठी अनेकदा जीमेलचा वापर करण्यात येतो. पण, रात्री उशिरापर्यंत येणाऱ्या ईमेलला रिप्लाय (उत्तर) किंवा काही सततचे ईमेल पाठवून कंटाळा आला आहे का? तसे असेल, तर तुमच्या इनबॉक्सला तुमच्या वेळापत्रकानुसार काम करण्यासाठी तुम्ही तयार करू शकता. म्हणजेच ईमेल शेड्युलिंग फीचरचा तुम्ही वापर करू शकता. जीमेलचे शेड्युलिंग फीचर हे एक बिल्ट-इन टूल आहे, जे तुम्हाला ईमेल लिहिण्याची आणि तो ऑटोमॅटिकपणे पाठविण्यासाठी वेळ आणि तारीख निश्चित करण्याची परवानगी देते. जर तुम्हालाही ईमेल शेड्युल करायचा असेल, तर ही माहिती अगदी शेवटपर्यंत वाचा…
तर, जीमेलवर ईमेल कसा शेड्युल करायचा ते चला जाणून घेऊ…
१. तुमचा ईमेल कंपोज करा.
कोणाला संदेश पाठवायचा आहे, विषय आणि इतर माहिती लिहून तुमचा नवीन ई-मेल तयार करून घ्या.
२. Schedule Send पर्याय शोधा.
डाव्या कोपऱ्यात असलेल्या Send बटणाच्या शेजारी असलेल्या खालच्या दिशेने असलेल्या बाणावर क्लिक करा आणि मग Schedule Send पर्यायावर क्लिक करा.
३. ईमेल पाठवायची वेळ निश्चित करा.
त्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एक विंडो येईल, ज्यामध्ये वेळ सेट करण्यासाठी तुम्हाला पर्याय मिळेल. तुमच्यासाठी योग्य वेळ निवडा किंवा विशिष्ट तारीख आणि तास निवडण्यासाठी ‘Pick date & time’वर क्लिक करा.
४. वेळापत्रक निश्चित करा
‘Schedule Send’वर क्लिक करून वेळापत्रक निश्चित करा. तुमचा ईमेल आता नियोजित वेळेपर्यंत तुमच्या ड्राफ्ट फोल्डरमध्ये सेव्ह केला जाईल.
काही महत्त्वाच्या टिप्स :
१. एडिट किंवा कॅन्सल करा : तुम्ही ईमेलमध्ये बदल करण्यासाठी किंवा ईमेल पाठवणे रद्द करण्यासाठी ‘Sent’अंतर्गत तुमच्या ‘Scheduled’ फोल्डरमध्ये शेड्युल्ड ईमेल ॲक्सेस करू शकता.
२. मोबाइल शेड्युलिंग : कम्पोझ स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपक्यांना टॅप करून जीमेल मोबाईल ॲपवर शेड्युलिंगदेखील उपलब्ध आहे.
३. थर्ड-पार्टी अॅड-ऑन्स : ॲडव्हान्स शेड्युलिंग फीचर्ससाठी, बूमरँग किंवा राईट इनबॉक्ससारख्या थर्ड-पार्टी अॅड-ऑन्सचा विचार करा