How To Schedule Text Messages On Android : काही जण लक्षात ठेवून अगदी योग्य वेळी मेसेज पाठवतात. काही जणांना अलार्म लावून आपल्याला एखाद्याला मेसेज करायचा आहे, असे लक्षात ठेवावे लागते. पण, अशा प्रकारे तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज भासत नसेल, तर तुम्ही भाग्यवान आहात. पण, ज्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांच्यासाठी ॲण्ड्रॉइड आणि आयफोन दोन्ही आता तुम्हाला संदेश शेड्युल करण्याची परवानगी देतात; जेणेकरून तुमचे मजकूर गरजेच्या वेळी अचूकपणे इतरांपर्यंत पोहोचतील. तर, ॲण्ड्रॉइड आणि आयफोनवर मेसेज कसा शेड्युल करायचा ते चला जाणून घेऊ…
ॲण्ड्रॉइडवर मेसेज कसा शेड्युल करायचा? (How To Schedule Text Messages On Android)
ॲण्ड्रॉइडवर गूगल मेसेजेस हे सर्वांत लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे आणि ते मेसेज शेड्युल करण्याचा एक सोपा मार्गसुद्धा प्रदान करते…

१. तुमच्या ॲण्ड्रॉइड डिव्हाइसवर गूगल मेसेजेस ॲप उघडा.
२. नवीन संभाषण सुरू करा किंवा आधीचे एखादे चॅट उघडा आणि तुमचा संदेश टाईप करा.
३. तुम्हाला अनेक वेळ पर्याय दिसेपर्यंत send बटण दाबा आणि धरून किंवा प्रेस करून ठेवा किंवा ‘Select date and time’वर टॅप करा.
४. संदेश पाठविण्याची तारीख आणि वेळ निवडा. नंतर ‘पाठवा’ बटणावर टॅप करा.
५. शेड्युल केलेला मेसेज एका आयकॉनने चिन्हांकित केला जाईल, जो तुम्हाला पाठविलेल्या मेसेजपेक्षा वेगळा असेल आणि ओळखण्यास मदत करेल.

आयफोनवर मेसेज कसा शेड्युल करायचा? (How To Schedule Text Messages On An iPhone)

IOS १८ पर्यंत आयफोनवर मेसेज शेड्युल करणे शक्य नव्हते. पण, आता हे फीचर उपलब्ध आहे…

१. तुमच्या आयफोनवर मेसेजेस ॲप उघडा आणि ‘प्लस’ आयकॉनवर टॅप करा.
२. ‘Send Late’ हा पर्याय निवडा आणि शेड्युलर ॲक्सेस करण्यासाठी Time वर टॅप करा.
३. मेसेजसाठी हवी ती वेळ व तारीख सेट करा आणि Send वर क्लिक करा.